बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यासह जळगांव जामोद तालुक्यात ११ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या सततच्या व अतिवृष्टी सदृश पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, मक्का, तूर या खरीप हंगामातील पिकांसह सुनगाव, जामोद या गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.यावर्षी जून महिन्यापासून पाऊस समाधानकारक असल्यामुळे आणि पिक सुद्धा जोमदार दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील पिकांवर खर्चही भरपूर केला. त्यातही या वर्षात खतांचे,कीटकनाशकांचे भाव गगनाला भिडल्यामुळे खर्चातही वाढ झाली, मजुरीच्या दरात सुध्दा वाढ झाल्यामुळे या वर्षातील शेतीचा आर्थिक नियोजन जास्तीचे वाढले.परंतु हे सर्व झाल्यावरही सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे सर्वच पिक जमीनदोस्त झाली आहेत.त्यामुळे पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ त्यांची नुकसान भरपाई त्यांचा बँक खात्यात देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० रुपये मदत शासनाने द्यावी.या मागण्यांसंदर्भात १३ सप्टेंबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार जळगांव जामोद यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली.यावेळी संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष रामा रोठे ,रुस्तम दाभाडे, दत्ता आटोळे, शुभम रोठे, आकाश आटोळे, वैभव दाभाडे, शुभम पाटील, योगेश दाभाडे, विलास पाटील, अंकित पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान.पिक विमा आणि हेक्टरी ५०००० रुपये मदत द्यावी.संभाजी ब्रिगेड ची तहसीलदार यांना निवेनाद्वारे मागणी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-