हिवरखेड नजीक चिलवाडी येथील संत लाहानुजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चितलवा डी ला सलग तिसऱ्यांदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला आहे.नुकत्याच झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी भागातील संत लाहनुजी महाराज विद्यालय चितल वाडी तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यांना सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे यापूर्वी या विद्यालयातील विद्यार्थी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले होते यावर्षी झालेल्या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटात सुद्धा कु.ज्योत्स्ना भास्कर मॅडम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विज्ञान विषयाचे मॉडेल मध्ये कू.रेणुका बजारे मॅडम व विद्यार्थी सौम्य इंगळे आणि ओजस इंगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला याकरिता मुख्याध्यापक कू.दीपाली म.वान खडे यांनी तसेच इतर शिक्षक संतोष वाडेकर ,सुशील खा रोडे सर तथा राजन वाघोडे पंकज इंगळे अमोल ताठे गोवर्धन सोळंके आणि मंगेश इंगळे या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीचे संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल पाटील बोंडे व सचिव सौ.शोभाताई अनिल बोंडे यांनी सर्व यशस्वी विध्यर्थी आणि शिक्षकाचे कौत्तुक केले .
संत लाहनुजी महाराज विद्यालयाचे घवघवीत यश,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड