केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचे जळगाव जामोद मतदारसंघात जंगी स्वागत...सेवा पंधरवाड्या अंतर्गत जळगाव जामोद येथे नेत्र शिबिराचा केला शुभारंभ...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

लोकसभा प्रवास योजने अंतर्गत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे जळगाव जामोद मतदारसंघात आ डॉ संजय कुटे व त्यांच्या सर्व सहकारर्यांनी जळगाव जामोद येथे जंगी स्वागत केले तसेच त्यांचे आगमांप्रसंगी आयोजित प्रत्येक कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी आजच्या या दौऱ्याला सुरवात करीत शेगाव येथे रोहित धाराशिवकर यांच्या रेशन दुकानाला भेट देत त्यासंबंधी च्या योजना व अडचणी बाबत चर्चा केली तर लाभार्थ्यांना आवास योजनेचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. त्यानंतर पातुर्डा येथील नियोजित कार्यक्रमास त्यांची उपस्थिती होती. याठिकाणी त्यांनी ऐतिहासिक अश्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विहिरीस भेट देत तेथील समाज बांधवांशी चर्चा केली.  त्याठिकाणी त्यांनी महापुरुषांना अभिवादन केले. भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या निवासस्थानी बूथ क्रमांक 222 ची बूथ समिती व पन्नप्रमुख यांचे शी सविस्तरपणे सवांद साधत बूथची रचना व कार्य याबाबत चर्चा केली. तसेच पातुर्डा येथिल जुने सरस्वती वाचनालय येथे भेट देत तेथे विविध स्तरातील नागरिकांशी सवांद साधला.  त्यानंतर जळगाव जामोद येथील नियोजित कार्यक्रमांसाठी ते रवाना झाले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने आयोजित मोटारसायकल रॅली मध्ये सहभागी होत दुर्गा चौक येथील हुतात्मा स्मारकास त्यांनी अभिवादन केले. याठिकाणी शहरातील आजी व माजी सैनिकाशी चर्चा केली यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते हजर होते. राष्ट्रपिता ते राष्ट्रानेता सेवा पंधरवाड्या अंतर्गत जळगाव जामोद मतदारसंघात स्व. श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित वर्ग एक ते वर्ग दहा च्या विद्यार्थी चे नेत्र तपासणी व उपचार शिबिराचा न. प. उर्दू स्कूल येथून मंत्री भुपेंद्र यादव यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.  त्यानंतर न्यू ईरा स्कूल जळगाव जामोद येथे वृक्षारोपण करीत शाळकरी विद्यार्थींसोबत त्यांनी दिलखुलास  चर्चा केली, यावेळी जळगाव शहरातील महिला मोर्चा सोबत त्यांनी चर्चा केली व त्यांचे स्वागत स्वीकारले. जळगाव शहरातील कुणाल गोडाले यांचे घरी भेट देत चहा पाणी घेतले व तद्नंतर श्रमजीवी लोकांसोबत केंद्र सरकार च्या योजना व कामगिरी बाबत चर्चा केली तसेच त्यांना अनेक सूचना ही केल्या, याप्रसंगी आ. डॉ. कुटेंनी सुद्धा या उपस्थितांशी संवाद साधत मी आधी आपल्यातील माणूस आहे नंतर आमदार असे नमूद करत आपण सर्वांनी केंद्रीय योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.  खांडवी येथील केसरबाई लांडे यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला होता त्यांच्या निवासस्थानी मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांत्वनपर भेट दिली.  या संपूर्ण दौऱ्यात आ डॉ संजय कुटे, आ ऍड आकाश फुंडकर, सोशल मीडिया संयोजक सागर फुंडकर, उपस्थित होते तर दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महामंत्री नंदुभाऊ अग्रवाल, जळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, जळगाव शहर मंडळ अध्यक्ष अभिमन्यु भगत, महिला मोर्चा अध्यक्ष शिल्पा भगत, कोअर समिती चे सदस्य यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post