"ई लर्निंग आधुनिक काळाची गरज"-श्रीकांत फडके सेवानिवृत्त जिल्हाधिकारी(सेवानिवृत्त जिल्हाधिकाऱ्यांची दि. न्यू इरा हायस्कूल ला भेट)


 जळगाव जामोद प्रतिनिधी:- 

आधुनिक काळात अध्यापनाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला असून जुन्या खडू व फलका सोबतच आता अत्याधुनिक ई लर्निंग या संकल्पनेची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी दिनांक.१४ सप्टेबरला शहरातील न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांतील ई लर्निंग उपक्रमाची पाहणी व शाळेला दिलेल्या भेटीदरम्यान  शिक्षकांसोबत चर्चा करताना केले.जळगाव जामोद शहरात नव्वदच्या दशकात उपविभागीय अधिकारी म्हणून श्रीकांत फडके कार्यरत होते त्यावेळी दि. न्यू इरा हायस्कूल व जळगाव शिक्षण मंडळासोबत  त्यांचे शैक्षणिक ऋणानुबंध  निर्माण झाले होते आता सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी जेव्हा जळगाव शहर गाठले त्या वेळेस त्यांनी प्रथम   शाळेला भेट दिली . या वेळी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल सचिव अनुप पुराणिक व जळगाव जामोद शहराच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई जयस्वाल यांनी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके व त्यांची पत्नी सुप्रिया फडके यांचा संस्थेच्या कार्यालयात  सत्कार केला .त्यानंतर त्यांना  संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल व सचिव अनुप पुराणिक यांनी   शाळेतील विविध उपक्रम व ई लर्निंग या नवीन शैक्षणिक संकल्पनेबाबत माहिती दिली.सेवानिवृत्त जिल्हाधिकारी फडके यांनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासोबत  संवाद साधून त्यांच्या कार्यकाळातील विविध  आठवणी व अनुभव   सांगितले. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक शेख सलीम ,पर्यवेक्षक ओंकारराव तायडे.ज्येष्ठ शिक्षक निळकंठ राठोड एस. एन. डाबेराव आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post