जळगाव जामोद तालुक्यामध्ये दिनांक 10 सप्टेंबर पासून अतिवृष्टी होत असून त्यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले असून, या अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन, कपाशी,मुंग,उडीद यासारखी हाता तोंडाशी आलेली पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल ताबडतोब प्रशासनास सादर करा,असे निर्देश माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आज जळगाव जामोद तहसील सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच त्यांनी सांगितले की पंचनाम्यापासून कोणताही शेतकरी वंचित ठेवू नका, यावेळी बैठकीला उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार सोलाट मँडम,कृषी अधिकारी धिरज वाकोडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे, नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी, तलाठी,कृषी सहायक या आयोजित बैठकीस उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून रिपोर्ट सादर करा आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे निर्देश...
जळगांव जा.प्रतिनिधी:-