चिखलदरा तालुक्यातील सलोना येथील धनराज गायन वय बारा वर्षे हा शाळेकरी विद्यार्थी दुर्गा देवी व गणपती ह्या देवी दैवत यांच्या मुर्ती कोणते ही प्रशिक्षण न घेता घरीच बनवित असल्याने त्याचे सर्व परिसरात कौतुक होत आहे धनराज हा गवळी समाजातील जन्माला आला असून अगदी लहान पासूनच त्याला विविध देवांच्या माती पासून मुर्ती बनविण्याचा छंद आहे त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे परंतु देवाने त्यांच्या अंगी लहान पासून च कलेचे वर्धान अर्पण केल्याने तो देवी देवतांच्या मुर्त्या घरीच मातीच्या साह्याने हुबेहूब तयार करत असल्याचे दिसून आले चिखलदरा पासून बारा किलो मीटर अंतरावर सलोना हे गाव डोंगराच्या कुशीत बसलेले आहे धनराज ने मूर्ती बनविण्याची कुठेही कला प्रशिक्षण घेतले नाही.बुद्धी कौशल्य त्यांच्या अंगी असल्याने शारदा देवी दुर्गा देवी गणपती ह्या देवांच्या मुर्त्या हुबेहूब तो तयार करतो, येजा करणारे नागरिकांना धनराज त्यांची कला व जिद्द पाहुन आचार्य सुद्धा वाटले इतक्या लहान वयात हा विद्यार्थी मूर्ती बनवत असताना देवीचे पूर्ण रूप त्याच्या डोळ्यात दिसून आले.वेगवेगळ्या देवी च्या रूपात सिंहाच्या पूर्ण कृती पुतळ्यावर मूर्ती मातीने बनविणे कोणत्या मूर्तीला बोलके करणे ही सर्वात मोठी कला गायन यांच्या अंगी दिसून आली धनराज गायन सारखे अनेक कलावंत चिखलदरा धारणी मेळघाटच्या कुषीत वास्तव्याला आहेत वेगवेगळ्या वस्तू पासून आपल्या कलेतून आपली कला ते गावा पुरतीच मर्यादित ठेवत असल्याचे बोलले जाते मेळघाट मध्ये अनेक कलावंत होत आहेत.परंतु त्यांच्या कलेला जनसामान्य नागरिकांपर्यंत कुणी प्रयत्न करत नसल्याने अशा कलाकाराचे नाव मेळघाटा पुरतेच व गावा पुरतेच मर्यादित असते अनेक मूर्ती कलाकार व झाडांच्या लाखडा पासून तर फांद्या पर्यंत बांबूंच्या टाकाऊ वस्तु चिखलदरा धारणी तालुक्यातील कलावंत बनवत असतात परंतु त्यांची कलेला प्रोत्सान न मिळाल्याने ती या घाटातच विरघळले जाते या तालुक्या मध्ये अनेक कलाकार असे आहेत की दगडा पासून अनेक वस्तू बनवून आपली कला गावाच्या नागरिकांना दाखवत असतात अशा मेळघाटातील कलावंतांना शासना कडून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्रोत्साहन दिल्या जात नाही.मातीला आकार देऊन व दगडावर कोरीव काम करून लाकडाला विशिष्ट आकार देऊनहे शिल्पकार निर्जीव वस्तूंना बोलके करतात असेअनेक उदाहरणं डोळ्या समोर असताना हे कलाकार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेत येत नाही.त्यामुळे अशा कलावंताची माती होत असताना दिसून येते सलोना येथील ह्या गरीब विद्यार्थ्यांचे जीवन दारिद्र्य मय असले तरी देवीची मूर्ती बनविताना त्यांच्या डोळ्यात आम्हाला आनंद दिसून आला ह्या लहान बाल मूर्ती कलाकाराला आर्थिक मदत केल्यास भविष्यात धनराज हा मेलघाट साठी आदर्श मोठा कलाकार होईल अशा चर्चा नागरिकां मध्ये होत्या चिखलदरा धारणी तालुक्यातील कलाकारांना वाव मिळत नसल्याने त्यांची कला मनातच गुदमरत आहे शेवटी अशी म्हणण्याची वेळ येते की अशा हुनर, असलेल्या कलाकारांच्या अंगी देवी शक्ती तर वास करत नाही ना असा प्रश्न मनाला भेडसावत आहे.डुबलीकेट प्लास्टर, ऑफ पॅरिस केमिकल, पासून बनविण्यात येणाऱ्या मुर्त्यांपेक्षा मातीच्यामुर्त्यांना नागरिकांनी वाव देऊन अशा मातीतुन मूर्ती बनविणाऱ्या कलावंताचे मनोबल प्रोत्साहन देऊन मुर्त्या खरेदी कराव्या असेही काही सुज्ञ नागरिका कडून बोलल्या जात आहे प्रशासनाने सुद्धा मेळघाटातील कलावंताच्या कलेची दाद देऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुद्धा होत आहे,
दैवी शक्ती मनात बाळगुन देवीची मातीची मूर्ती बनविणारा अल्पवयीन मुलगा धनराज गायन..जगतो दारिद्र्याचे जीवन..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...