पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे रांगोळी स्पर्धा व पोषक सकस आहार कसा असावा सुदृढ बालक बालिका स्पर्धेचे आयोजन संपन्न..


 मंगल काकडे. जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी..

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे   श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद व एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २१/९/२०२२ सप्टेंबर रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प जळगाव जामोद अंतर्गत पोषण अभियान अंतर्गत सुदृढ बालक बालिका स्पर्धा यामध्ये रांगोळी स्पर्धा व पोषक मूल्यासहित सकस आहार कसा असावा अशी पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या पोषण अभियान कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती.आमदार संजय कुटे यांच्या पत्नी सौ.अर्पणाताई कुटे यांच्या सह माजी जिल्हा परिषद सदस्य विरोधी पक्षनेता श्रीराम अवचार. माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.पूजाताई अवचार. माजी पंचायत समिती सदस्या सौ.विमलताई कळस्कार.माजी पंचायत समिती सभापती सौ.सविताताई राऊत.पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रीतीताई तायडे. उपसरपंच सौ.भारतीताई बांगर. तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.यावेळी पोषणासह सकस आहाराबाबत तसेच बाळाचे जन्मानंतर नाहीतर जन्मा आधीच काळजी घ्यायला हवी असे सौ.अर्पणाताई कुटे यांनी आपल्या भाषणात सांगितले तसेच  अर्पणाताई कुटे. यांच्याकडून श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद यांच्या वतीने सुदृढ बालक बालिकांना बक्षीस वाटप करण्यात आले.कार्यक्रमास सुनिताताई वानखडे बालविकास प्रकल्प अधिकारी.पर्यवेक्षिका सौ.रेखाताई वानखडे. सौ.गिताताई मानगांवकर सौ.सुनिताताई फिस्के. तसेच सर्व अंगणवाडी सेविका. मदतनीस. आशा सेविका. तथा गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous Post Next Post