अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी..
हिवरखेड येथे ठीक ठिकाणी गुणवंत महाराज जन्मसोहळा थाटात साजरा करण्यात आला असून गावा नजीक झरीबाजार येथे सुद्धा मोठया प्रमाणात गुणवंत महाराज मंदिरात महाराजांचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला,तर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, झरी येथील पुजारी तायडे महाराज यांनी कार्य संभाळले तर हिवरखेड गुणवंत महाराज बहीरमबुवा संस्थानवर सागर महाराज ऊरकडे, अजय इगळे, नागशन इगळे, अनिल कवळकार, हागे, यांनी काम पाहिले व हिवरखेड वार्ड क्र २ मधील गुणवंत महाराज संस्थान येथे गुणवंत महाराज जन्मउत्सव मोठया जल्लोषात ,आनंदात साजरा करण्यात आला, गावातून महाराजांची मिरनुक काढून ,महाआरती करून तसेच सस्थानवर पाळणा तयार करून महाराजांच्या आईवडिलांच्या मूर्तीचे पूजन करून हजारो भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला, यामध्ये प्रसादी विजय महाराज मानकर, रमेश कवळकार, गणेश महाराज मानकर, रेखा मानकर,शांताबाई मानकर,प्रकाश शिरसाट, तायडे, संतोष मानकर, इंगळे दादू हिवराळे, पंकज हिवराळे,पवन नेरकर, वनकर,विजय सिरसाट, आधी भाविकांनी सहकार्य केले,तर गुणवंत महाराज की जय घोषणाने सर्व परिसर भक्तिमय दिसुन आला,