आकी परीसरातील शेतात आस्वलीने केले भुईमूग चे नुकसान...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

चिखलदरा तालुक्यातील आकी व चौऱ्यामल या गावातील शेतकऱ्यांचे भुईमूग चे नुकसान जंगली जनावर जास्त करीत असुन येथील शेतकरी अहवालदिल झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.मागील काही दिवसा पुर्वी चौऱ्यामल गावातील शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला चढविला असता येथिल शेतकरी चागल्याच प्रकारे जखमी झाला होता. त्याच प्रकारे १७/९/२०२२ च्या रात्रीला आकी गावातील शेतकरी खाण्या कुचू बेलसरे हे शेतात भुईमूग ची रखवाली करण्या करीता गेले असता रात्री १२ वाजता च्या सुमारास त्याचा शेतात दोन अस्वलाने येवून दोन एक्कर शेतातील भुईमूग चे नुकसान केले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न आकी येथिल शेतकऱ्यांने केला आहे. माझ्या शेतात जे काही नुकसान जंगली जनावरानी केला हे नुकसान वनविभाग प्रसाशने भरुन द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांची जोर धरत आहे. तसेच असे प्रकरण वारंवार घडत असुनही येथिल वनविभागाचे अधिकारी कुंभकर्णाच्या झोपेत दिसून येत आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कास्तकार यांच्या शेतातील नुकसान जंगली जनावरानी करु नये असे काही तरी उपाय काढावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे. अन्यथा येथिल परीसरातील शेतकरी वनविभागाच्या कार्यलया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे बोलले जात आहे.

Previous Post Next Post