काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी देशात काँग्रेस पक्षाला नव संजीवनी देण्याकरिता भारतभर पैदल फिरून भारत जोडो अभियान राबवित आहेत. या अभियानांतर्गत आगामी 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा मजबूत व्हावा तसेच काँग्रेसच्या विविध राज्यातील आजच्या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी हा उद्देश आहे. भारत जोडो अभियान यशस्वी होण्याकरिता भारतातील काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते मनापासून कार्यरत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा दौरा बुलढाणा जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित असून या दौऱ्या संदर्भात आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आज जळगाव जामोद येथील सातपुडा कॅम्पस मध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या आढावा बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी राहुल गांधी यांच्या मार्गाची पाहणी करून जिल्ह्यामधील सभा कुठे घ्यावी याकरिता चाचपणी केली. राहुल गांधी यांच्या सभेवरून जळगाव मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये एक मत दिसून आले नाही. काही नेत्यांच्या मते राहुल गांधी यांची सभा शेगाव मध्ये असावी तर काही काँग्रेस नेत्यांनी सभा जळगाव मध्ये घेण्याचा नानासमोर अट्टाहास केला. यावरूनच आधीच विविध गटात विभागलेल्या काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजीचे मोठे खिंडार पडत आहे हे आजच्या बैठकी वरून दिसून आले.बैठक सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत कलह चेहऱ्यावर दिसून येत होता परंतु पक्षश्रेष्ठीपुढे आपली भावना दाखवण्याचे धाडस किंवा हिंमत कोणीही केली नाही.पत्रकारांनी नाना पटोले यांना काँग्रेस मधील अंतर्गत कलहा बद्दल विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला.आज देशामध्ये राहुल गांधी भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून भारतातील 130 कोटी जनतेला जोडण्याचा प्रयत्न करत आहे .राहुल गांधी देशातील मतदाराला एकत्र करण्यासाठी अथक परिश्रम करीत असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नी जळगाव मतदार संघातील गटा तटात विभागलेल्या काँग्रेसला जोडण्यासाठी परिश्रम करावे अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.
जळगाव मतदार संघाला भारत जोडो अभियानापेक्षा काँग्रेस जोडो अभियानाची गरज... जळगाव मतदारसंघातील काँग्रेस मधील अंतर्गत मतभेदाला नानांचा दुजोरा...
जळगांव जा.प्रतिनिधी:-