वनविभागतील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल..हतरु येथील आदिवासीना जंगलात मारहाण करणे महागात पडले...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

वन कर्मचाऱ्यावर एक महिन्या नंतर ॲट्रॉसिटी ॲक्ट  गुन्हा चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत रायपूर हात्रु येथील आदिवासी युवकांना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वन कर्मचाऱ्यांनी पोळ्याच्या दिवशी मासेमारी करिता गेलेल्या माडी झडप जंगलात मासेमारीच्या संशयावरून मारझोड करून जातिवाचक शिवीगाळ व ऊटबस्या काढून मानसिक त्रास दिल्या प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी दिनांक 28/8/022 रोजी पोलीस स्टेशन चिखलदरा येथे लेखी तक्रार दाखल केली होती परंतु त्यांना कोणताही न्याय मिळत नसल्याने घटनेतील फिर्यादी श्री भाऊराव मोतीलाल ठाकरे वय छत्तीस वर्षे राहणार हातरू यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कडे तक्रार दिली होती सोबतच वकील संघटनेचे काही पदाधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत होते.घटनेचे गंभीर चे लक्षात घेता पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाढवे यांनी आज दिनांक 26/9/022  रोजी फिर्यादीचे लेखी रिपोर्ट नुसार फॉरेस्ट विभागाचे वन कर्मचारी , शेलार वनरक्षक (2) माहूरकर वनरक्षक (३) श्री वडुळकर वनरक्षक वाहन चालक ४) श्रीराम बेठेकर यांच्या विरोधात अपराध क्रमांक 0 22/207/22 कलम 3(१)आर एस अनुसूचित जाती जमाती कायदा सह कलम 323/294,34 भा,द वि कलमा नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे करीत आहेत.फॉरेस्ट विभागा च्या कर्मचाऱ्यां वर वेगवेगळ्या वर्तुळात मेळघाट मध्ये सातत्या ने अशा पद्धतीच्या गुन्हे दाखल होत असल्याने या विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे अशा चर्चा नागरिकां मध्ये ऐकायला मिळाल्या. एक महिना नंतरहा गुन्हा दाखल झाल्याने फिर्यादी आदिवासी युवकांना आता आपल्याला न्याय मिळेल अशी आशा मनात आहे अशी प्रतिक्रिया फिर्यादीने आमच्या  प्रतिनिधीला सांगितले

Previous Post Next Post