संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लंपी आजाराचा वाढत असलेला प्रादुर्भाव त्यातच जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे जनावरांना लंपीचे लक्षण आढळून आलेले आहे गुरांना हलकासा ताप येणे अशा प्रकारचे लक्षण आपल्या गुरांमध्ये आढळले तर लगेचच संबंधित पशु विभागाशी संपर्क साधावा जेणेकरून त्या आजाराचा प्रादुर्भाव वाढणार नाही. आसलगाव ग्रामपंचायत अंतर्गत लंपी आजारावर प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर घेण्यात आले यामध्ये जनावरांना लस देण्यात आली.यावेळी आसलगांवचे सरपंच सुनील डिवरे यांनी लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे हे लक्षात येताच तात्काळ संबंधित ग्रामपंचायत मध्ये मीटिंग घेऊन लंपी आजाराची लस उपलब्ध करून दिली आणि गावामध्ये तात्काळ सर्व नागरिकांना लसीकरण संदर्भात सर्व शेतकऱ्यांना माहिती दिली की आपल्या जनावरांना लस देणे आवश्यक आहे यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले गाई म्हशी बैल यांना लस टोचून घ्यावी असा संदेश ग्रामपंचायत मार्फत देण्यात आला तालुका पशु अधिकारी डॉ तोडकर डॉ निमजे डॉ राजेश भेलके डॉ चांदणे डॉ इंगळे डॉ संदिप गाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विष्णू इंगळे संजय तायडे ग्रामपंचायत कर्मचारी मधु इंगळे विजय इंगळे श्याम पोलाखडे यांच्या सहकार्याने लंपी रोगाला प्रतिबंधक करण्यासाठी लसीकरण करण्यात आले.
जनावरांवर लंपीचा वाढता प्रादुर्भाव पाहता आसलगाव ग्रामपंचायत अंतर्गत लसीकरण मोहीम...
जळगांव जा.प्रतिनिधी:-