निसर्गाच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांनि पिके काढू नये,,,,,हवामान तद्दंन पंजाब डंख,पंजाब डंख याचें मार्गदर्शन घेण्यासाठी हजारो शेतकऱ्याची गर्दी,


अर्जुन खिरोडकार/प्रतिनिधी हिवरखेड..

हिवरखेड येथे २० सप्टेंबरला खारोन पुऱ्यातील  माळी वैभव मंगलकार्यालयात  प्रसिद्ध हवामान तद्दन पंजाब डंख यांचा शेतकऱ्यांना  पिकासबंधीत  विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमात हजारो शेतकऱ्यांनि हजेरी लावली होती,  शेतकऱ्यांनि पिकांचे संरक्षण कसे करावे, मुसळधार पाऊस, गारपीट, विजेचा कडकडाट , या विषयावर हवामान तज्ञानि मार्गदर्शन केले असून त्यांनी सांगितले निसर्गाच्या विरोधात जाऊन पीक पेरणी करून नका, जास्तीत जास्त वृक्षारोपण करा, जेवढे जास्त झाडे येतील तेवढा जास्त पाऊस पडेल व मग कधीच पाणी टंचाई भागणार नाही, व येत्या तीन दिवसांत  २२,२३,२४, ला हिवरखेड भागात मोठया प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले असून शेतकऱ्यांना राहिलेल्या या दोन दिवसात पिकांची कामे अटपावि तसेच  कोकिळा, सुतार पक्षी, सरडा , घोरपड, हे विविध पक्षी सुद्धा पावसाचा अंदाज त्यांच्या वागणूकीवरून देत असल्याचे हवामान तज्ञांनि सांगितले, विजे पासून शेतकऱ्यांनचे संरक्षण कसे करावे,पिकांची राखण असे विविध विषयांवर शेतकऱ्यांना पंजाब डखं यांनी मार्गदर्शन केले,   हा  कार्यक्रम राठी कृषी सेवा केंद्राच्या  वतीने घेण्यात आला,  असून उपस्थित शेतकऱ्यांना भोजनाची व्यवयस्था सुध्दा करण्यात आली  यावेळी हवामान तद्दन पंजाब डंख  , विनय राठी, महेंद्र कराळे,आदी शेतकऱ्यांनचि उपस्थिती होती  कार्यक्रमाच्या शेवटी  हवामान तंज्ञ  पंजाव डंख यांचा उपस्थित शेतकरी ,पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार घेण्यात आला, यावेळी उपस्थित सदानंद खारोडे, धीरज बजाज,बाळासाहेब नेरकर, गजानन राठोड, पंकज राऊत, अंकुश राऊत,भोंगळे सर यांच्या उपस्थितीतसह परिसरातील गोर्धा, तळेगाव, कार्ला,खंडाळा,चित्तलवाडी, झरी, चिचारी, हिंगणी परिसरातील शेतकऱ्यांनची उपस्थिती लाभली..

Previous Post Next Post