हिवरखेड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन...रुग्णांनी लाभ घ्यावा-प्रेस क्लब हिवरखेडचे आवाहन...


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

प्रेस क्लब हिवरखेड, संवाद परिवार व गोदावरी फौंडेशन जळगावच्या संयुक्त विद्यमाने स्व.कमलिनीताई भोपळे स्मृतिप्रीत्यर्थ सोमवार दि.२६ सप्टेंबर ,घटस्थापनेच्या दिवशी सहदेवराव भोपळे विद्यालयात मोफत भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगावचे तज्ञ डॉक्टर या शिबिरात रुग्णांची तपासणी करतील.रुग्णांना मोफत २ डी इको, ईसीजी,कार्डीओग्राफ देण्यात येतील.शिवाय मधुमेह, रक्तदाब,मुतखडा,प्रोस्टेट,पित्ताशय खडा,विविध प्रकारच्या गाठी,थायरॉईड, पाईल्स, भगंदर,फिशर,हर्निया,अल्सर, अपेंडीक्स या सारख्या आजारांवर मोफत उपचार केले जातील.याशिवाय नाक,कान, घसातज्ञ,नंतर तज्ञ,स्त्रीरोग तज्ञ,अस्थीरोग तज्ञ, सुद्धा रुग्णांची तपासणी तपासणी करून मोफत उपचार उपलब्ध करून देणार आहेत.अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीची गरज असलेल्या रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सकाळी १० ते दुपारी ३ वा.पर्यंत आयोजित या शिबिराची नोंदणी फी नाममात्र ५० रु.ठेवण्यात आलेली असून रुग्णांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र भोपळे विद्यालय हिवरखेड किंवा शक्ती मेडिकल मेन रोड हिवरखेड येथे आपली नावे नोंदवावीत असे आवाहन प्रेस क्लब हिवरखेडने केले आहे.

Previous Post Next Post