लंपी आजारावर गुराढोरांना लस कमी पडू देऊ नका...लंपी आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या गुराढोरांची शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या...


 जळगाव जा.प्रतिनिधी:- 

संपूर्ण देशभरामध्ये गुराढोरांवर लंपी या आजाराने थैमान घातलेले आहे.या आजारामुळे जनावरांच्या अंगावरती मोठ-मोठ्या गाठीयेऊन जनावरांना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे.लंपी या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.या आजारामुळे बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा अनेक ठिकाणी जनावरे इलाजाअभावी मृत्यूमुखी पडत आहे.त्यामुळे लंपीच्या वाढत्या आजारामुळे एकही जनवर लसी अभावी वंचित राहू नये.हे लक्षात घेता जळगाव जामोद तालुक्यामध्ये जनावरांना लंम्पीची लस कमी पडू देऊ नका.तसेच जे जनावर लंपी आजारामुळे मृत्यूमुखी पडली अशा जनावरांची शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी. असा प्रस्ताव शासन स्तरावर तयार करावा.ही मागणी दिनांक १२ सप्टेंबर ला भूमिपुत्रांनी घेऊन गटविकास अधिकारी भुसारी मॅडम जळगाव जामोद यांच्याकडे चर्चेद्वारे मांडली.

Previous Post Next Post