जिल्ह्यात लंपी लसीचा पुरेसा साठा उपलब्ध:-खासदार प्रतापराव जाधव...जिल्हा विकास व संनियंत्रण समितीची सभा..


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

बुलडाणा जिल्ह्यात लंपी लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे . नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि जनावराचे लसीकरण करावे तसेच काही समस्या असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली.  खासदार प्रतापराव जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांची पिक विमाबाबत तक्रारी आल्यास नियमानुसार ७२ तासात पंचनामा करावा, दहा दिवसांत पंचानाना झालेला नसल्यास पंचनामा झाला असे मानून त्याला विम्याची मदत देण्यात यावी. कोणत्याही कारणाने शेतपिकाचे नुकसान झाले असल्यास पिकविमाचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले. मनरेगामधून वैयक्तिक लाभाच्या योजना मोठ्या प्रमाणात घेण्यात याव्यात. यात कुशल, अकुशलचे प्रमाण पाळण्यात यावे. ई क्लासच्या जमिनी वरील अतिक्रमण काढण्यात यावे. ही जागा ग्रामपंचायती ने ताब्यात घेवून फळझाडे शेततळे विहीर घेवून विकास करावा. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरीबाबतची कामे मनरेगामधून करण्यात यावे. यात नियमाने पात्र सर्व शेतकर्याना मदत देण्यात यावी. जिगाव प्रकल्पाचे काम सुरु ठेवण्या बरोबर पूनर्वसनाची कामे चांगल्या दर्जाची आणि प्राधान्याने पूर्ण करावी. या गावात पूर्ण १८ सुविधा देण्यात यावे. घरासाठी जागा देताना चांगली जमिनी दिल्या जावी. नियमित कर्ज भरणाऱ्याना पुन्हा कर्जाची सुविधा द्यावी. एटीएमधारकांना मिळणाऱ्या एक लाखाच्या विम्याची प्रसिद्धी करण्यात यावी. शालेय पोषण आहार लाभार्थ्यांना योग्यरित्या पोहचवावा. गरोदर माता स्तनदा माता आणि बालकांना पोषण आहार देत असताना कुपोषणाच्या घटना घडू नये. पुरवठा करण्यात येणारा पोषण आहाराची तपासणी करण्यात यावी. बचतगटांची चळवळ चांगली रुजली आहे. त्यांच्या उत्पादित वस्तूसाठी मार्केटींगची व्यवस्था करण्यात यावी. दुर्गम भागातील बचत गटांना मदत करावी. घरकुल योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देण्यात यावा. कामांना मंजुरी देवून कामे तातडीने सुरु करावे. यातील अपात्र लाभाथींना वगळून प्रतिक्षा यादीवरील लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. बैठकीत विविध रस्ते मार्गाची सध्यास्थितीचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी आणि अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आला. बैठकीत शहरी आवास योजना जलजीवन मिशन डिजटल इंडिया ग्रामपचायत इंटरनेट व्यवस्था प्रधान मंत्री ग्रामसडक योजना ग्रामीण पेयजल योजना अटल भूजल जिवनोन्नती अभियान दूरसंचार विज वितरण कंपनी संसद आदर्श ग्राम आदींचा आढावा घेण्यात आला.

Previous Post Next Post