डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील सत्र 2021 22 मध्ये वर्ग आठवीची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करून विद्यालयाचे नाव लौकीक केले. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा पात्र केलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 12 हजार रुपये याप्रमाणे इयत्ता नववी ते बारावीपर्यंत एकूण 48 हजार रुपयाची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळते.डॉक्टर आंबेडकर विद्यालयात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी बहुजन समाजातील असून आर्थिक दृष्ट्या खूप गरीब आहेत.अशा विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती निश्चितच महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विश्व मंदिर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव ढोकणे,तर सेक्रेटरी अॅड. एस. वाय. खिरोडकर आणि संचालक मंडळाने मुख्याध्यापक, शिक्षक आणि पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तर विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.टी भारसाकळे यांनी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करून येणाऱ्या वर्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एन. एम. एम .एस या शिष्यवृत्ती परीक्षेला बसून शासनाच्या या सदर परीक्षेत शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.सदर परीक्षेत खालील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले .कुमारी नीता रोहनकर, वैष्णवी धोटे,प्रेरणा जवळकर, प्रमोद सोनवणे,नेहा हागे, कोमल सोनवणे ,विशाखा साबळे ,कोमल बारहाते, विशाखा वानखडे, पुनम टापरे ,निशान जाधव ,सम्यक भगत ,संदेश तायडे, जानवी पारस्कर ,गौरी पारस्कर, प्राची दिघडे ,खुशी निंबाळकर, राहुल रोहनकार ,रोशन जाणे ,आणि इतर विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक व्ही टी भारसाकळे पर्यवेक्षक पी.पी.भागवत , डी. व्ही.इंगळे ,के .आर .पवार, के. ओ .इंगळे ,डी.पी .कोकाटे, एम. बी.पवार ,एस पी. तिजारे ,एस.आर निकास एन .व्ही .भागवत इत्यादी शिक्षकांची उपस्थिती होती
डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव..
जळगाव जामोद प्रतिनिधी:-