हिवरखेड नजीक असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी उमरशेवडी च्या भागात ३ शेतकऱ्यांनच्या शेतातील पिकांवर अचानक वीज कोसळली व शेतकऱ्यांनचे कपाशी पीक जळून खाक झाले, पिक खाक झाल्याने व तोंडचा घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाले, यामध्ये आदिवासी शेतकऱ्यानचा सहभाग आहे, बालसिंग सोळंके, सर्व्ह क्र १/ब माणिक मावसे सर्व्ह क्र२४ उंबरशेवंडी, ईसराईल खा समद खा, सर्व्हे क्र,२ इत्यादि शेतकऱ्यांनच्या शेतातील पिके उध्वस्त झाली , ज्या ज्या पिकांचे शेताचे नुकसान झाले त्याची पाहणी संबंधीत तलाठी यांनी करून नुकसान धारक शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नुकसान धारक शेतकरी करीत आहेत, तसेच या अगोदर सुद्धा या भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वीज कोसळली होती, त्यांना शेतकऱ्यांना अजूनही मदत जाहीर झाली नाही, याबाबत सुद्धा वरिष्ठांनि चौकशी करून शेतकऱ्यांनची समस्या सोडवावी, व वीज पासून काही उपाय योजना कराव्यात अशी सुद्धा मागणी आदिवासी शेतकरी करीत आहेत,
शेतकऱ्यांनच्या पिकांवर वीजेने केले आक्रमण,उमरशेवडी नुकसान धारकांना शासनाने मदत घोषित करा,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...