भर पावसात दोन दिवसीय गणेशोत्सव मिरणूक हिवरखेड मध्ये संपन्न,पावसात भिजणाऱ्या कर्तव्यदक्ष खाकीचा सत्कार,भर पावसात घेतला गणेश भक्तांनी मनसोक्त आनंद,


 प्रतिनिधी हिवरखेड/प्रशांत भोपळे...

हिवरखेड येथे दोन दिवसीय गणेशोत्सव मिरणूक शांततेत पार पडली, यामध्ये पहिल्या दिवसी पावसाने दांडी मारली तर दुसऱ्या दिवशी सुध्दा मुसळधार पाऊस आला, एवढ्या मोठ्या पावसात सुद्धा गणेश भक्त  यांचा उत्साह कमी न होता याउलट अधिक वाढून गणेश मंडळांनी  मनोसक्त आनंद घेतला,  तसेच भरपावसात न डगमगता  खाकी वर्दीतील पोलिसांनी विशेष सहकार्य करून आपल्या कार्याचा पुरावा दिला,  सर्व पोलीस बांधवांचा सत्कार सुद्धा  गावातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व आदर्श पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आला, आकोट एस, डी , पी , ओ, मैडम रितू खोकर ,  ठाणेंदार विजय चव्हाण, हिवरखेड बिट अंमलदार, सर्व पोलीस स्टॉप याचा सत्कार , पत्रकार  राजेश पांडव, अनिल कवळकार, धीरज बजाज, जितेश कारिया, सुरज चौबे, अर्जुन खिरोडकार, यांच्या वतीने करण्यात आला, तर गणेश मंडळाच्या अध्यक्ष उपाअध्यक्षाचा सत्कार,  एम,सी, एन,चे मोहन सोनोने, संतोष सोनोने,गणेश भड, आशिष नाठे, पाटील सर , सागर खारोडे, तसेच अल्पसंख्याक आघाडीचे गणेश सूरजोसे, अर्जुन खिरोडकार हे होते,तर जानामाय उत्सव मंडळाच्या वतीने गणेश भक्तांना खिंचडीचे वितरण करण्यात आले, तर इतर विविध संघटना ,पत्रकार बांधवांच्या वतीने अल्पोपहार वितरण करण्यात आला, बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली, तसेच शांततेत गणेशोत्सव मिरणूक पार पाडण्यासाठी गणेश भक्तांचे, शांतता समितीचे, ग्रामपंचायत प्रभारी सरपंचांनचे, महावितरणचें, सामाजिक कार्यकर्त्याचें, पोलीस प्रशासनाचे, ग्रामपंचायत हिवरखेड , पोलीस पाटील, युवा गणेश भक्त,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, इतर पत्रकार बांधवांचे सहकार्य लाभले, गणेश मिरणूक पाहण्यासाठी भर पावसात गावातील पुरुषासह महिलांनी हजेरी, अनेकांनमध्यें  उत्साह ,आनंद दिसून आला, छोटया कलाकारांनि वेगवेगळ्या वेशभूषा सुद्धा घेऊन अनेकांनचे मनोरंजन केले,  सर्वांनी स्वयंस्फूर्तीने जल्लोषात गणरायाला निरोप दिला , हिवरखेड मेंरोडवरील जामा मजिद जवळ एकात्मतेचा संदेश देऊन निरोप समारंभ देण्यात आला,  गणेश भक्तानी गणपती बाप्पा मोरया,पुढल्या वर्षी लवकर या,या  जयघोष्नेने दोन दिवसीय मिरणूक पार पडली,असून हिवरखेड पोलिस स्टेशनमधील गणरायाला निरोप देण्यात आला व महाप्रसाद वितरित करण्यात आला,

Previous Post Next Post