चिखलदरा तालुक्यातील टेब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या चौऱ्यामल गावात आज शेतकरी श्री शंकर बेलसरे हे शेती चे काम करण्यासाठी शेतात गेले असताना अचानक अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला चढविला.चौऱ्यामल हे सती दहिगाव रेचा प्रादेशिक वनविभाग अंतर्गत येत असून या भागात काही प्रमाणात वन्य प्राण्याचा वावर असतो आकी सक्ती पिपादरी काकाधरी मोरगड बदलापूर हे गावे जंगलाच्या भागात असून या ठिकाणी काही शेतकरी शेती सुद्धा करत आहेत या जंगलात अंशतः बिपट रानडुक्कर अस्वल कोल्हे अशा प्राण्यांचा वावर असतो टेंब्रूसोंडा वन वर्तुळात हे गावे समाविष्ट आहेत अनेक वेळा या भागातील शेतकऱ्यांवर मजुरावर जंगली प्राण्यांनी हल्ले केले आहेत या हल्ल्यात शंकर बेलसरे यांच्या दोन्ही पायाला अस्वलाने दाताने चावा घेतला असून अस्वलाच्या नखाने शंकर बेलसरे हे गंभीर जखमा झाल्या आहेत त्यांच्या पाया ला खोल जखमा झाल्याने ते रक्तबंबळ अवस्थेत जवळच्या टेबुरसोंडा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल झाले होते प्राथमिक उपचारा नंतर त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती येथे खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय अमरावती येथे भरती करण्यात आले आहे ,या भागात आदिवासी नागरिकांचे अनेक वेळाअमोर_ समोर हल्ले झाले आहेत, शंकर बेलसरे यांच्या मागे आप्तपरिवार असून त्यांच्या कुटुंबावर आता उपासमारी ची वेळ आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून लवकरात लवकर या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे.अन्यथा येथिल गावातील आदिवासी संघटना वनविभागाच्या कार्यल्य चिखलदरा येथे आमरण उपोषण बसणार असल्याचे चौऱ्यामल गावकऱ्यां कडून समजले जाते
शाहानुर धरणा जवळ चौऱ्यामल शेत शिवारात अस्वलाने केला शेतकऱ्यावर हल्ला,हल्ल्यात शेतकरी, शंकर बेलसरे गंभीर जखमी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...