हिवरखेड गणेशोत्सव मिरणूक मध्ये कलाकारांनि निभावल्या वेगवेगळ्या वेशभूषा,दोन व्यक्ती साकारली राम रहीम वेशभूषा...


हिवरखेड प्रतिनिधी, प्रशात भोपळे

हिवरखेड येथे दोन दिवसीय मिरणूक मध्ये वेगवेगळ्या मंडळांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये पहिल्या दिवशी गावाच्या मुख्य मार्गावरून गणेश मिरणूक पार पडते गावातील नागरिक महिला पुरुष आतुरतेने मिरणूक पाहण्यासाठी हजेरी लावतात तर दुसऱ्या दिवशी मिरणूकला यात्रेचे स्वरूप येते गावातील छोटे कलाकार  गणेश मिरणूकच्या दुसऱ्यादिवशी वेगवेगळी वेशभूषा धारण करून गावकऱ्यांना सामाजिक संदेश देतात, यांच्या वेशभूषातुन यांना पाहणाऱ्याना बोध मिळतो, नंदू कोडपे,व विजय नेरकर यांनी याच्या जीवनात काही महान कार्य केले नाहीत परंतु या दोघांनी राम रहीम वेशभूषा या मिरणूक मध्ये घेऊन गावकऱ्यांना ऐकतेचा संदेश दिला, तसेच वासुदेव वाघ यांनी वैरागी व मंगेश हागे यांनी गारोडयाची वेशभूषा घेऊन मिरणूक  पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मनोरंजन केले,

Previous Post Next Post