प्लान इंडिया आणि रेक्कीट च्या संयुक्त विद्यमाने रिच इच चाइल्ड कार्यक्रम अंतर्गत पोषण माह निमित्त संपूर्ण महिना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून बोदू व कन्हेरी गावात १ सप्टेंबर २०२२ व २ सप्टेंबर २०२२ रोजी कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हा माता व बालक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी ठरावा या उद्देशाने आयोजीत केला जात आहे कार्यक्रमामध्ये माता व बालक यांच्या पोषणाविषयी व चांगल्या सवयी विविध स्पर्धातून योग्य माहिती देण्यात आली, जसे पोस्टर प्रतियोगिता, प्रश्न मंजुषा, पोषण खेळ, पोषण rally, इ. चा समावेश करण्यात आला. विजेत्या मातांना परसबाग / पोषणबाग लावून हिरव्या इ पौष्टिक पालेभाज्या लावनेसाठी परसबाग ची बियाणे देऊन प्रोत्साहित करण्यात आले तसेच बालकांच्या अंगी असणारे कौशल्य विकसित होईल या दृष्टीने विजेते बालकांना drawing book, color पेन्सिल, sharpner इ. बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमात गावातील गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली तसेच अंगणवाडी सेविका बबिता मावस्कर, सविता बेठेकर, व जिल्हा परिषद शाळा कन्हेरी येथील शिक्षिका कल्पना तोडसम, प्रगती डांगे, उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सुपरवायझर सुशीला दहीकर, ए. एन. एम. पाटणकर, ग्राम बोदू सरपंच – रामभाऊ बेठेकर, सामाजिक कार्यकर्ता – निलेश बेठेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आयोजन डॉ. कोमल गोस्वामी, डॉ. अंकित बहल, श्री. दत्तात्रय सोनगरे, सुरज पवार ब्लॉक ऑफिसर यांनी केले.
प्लॅन इंडिया आणी रेक्कीट च्या संयुक्त विद्यमाने रिच इच चाइल्ड अंतर्गत पोषण माह निमित्त संपूर्ण महिना विविध कार्यक्रमाचे आयोजन..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी