चिखलदरा आदिवासी सेवा योजना अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालयाच्या वतीने संपूर्ण चिखलदरा तालुक्यात पौष्टिक पोषण आहार अभियान राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यालयाचे अध्यक्ष वानखडे साहेब,यांच्या मार्गदर्शनात हे कार्यक्रम संपन्न झाला. अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर कु. सालिया खान, यांचे विशेष प्रयत्नाने आदिवासी अतिदुर्गम भागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.गावातील अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर,गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होते.चिखलदरा तालुक्यात आदिवासी लहान मुलांना पौष्टिक आहार उत्कृष्ट भोजन मिळावे या साठी कार्यालयाचे प्रयत्न आहेत, सोबतच गरोदर माता यांना पोषण आहाराची माहिती देऊन कुपोषित मुलांचा जन्म होऊ नये म्हणून, यासाठी शासनाची ऑटोकाट प्रयत्न मेळघाटात सुरू आहेत.अंगणवाडी कार्यालयाच्या माध्यमातून ही मोहीम आमझरी निसर्ग रम्य या ठिकाणी गावात प्रभात फेरी काढून जणजागृती करण्यात आली. या गावातील सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच श्री हेगडे, व सरपंच, पोलीस पाटील,बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला होता. अशाच पद्धतीचे उपक्रम संपूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात व अतिदुर्गम भागात राबविण्याचा माणस आहे. असे मत एकात्मिक सेवा बालविकास प्रकल्प अधिकारी वानखडे, व अंगणवाडीच्या सुपरवायझर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. आमझरी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने किशोरवयीन मुली लहान मुलं व स्त्रियांनी सहभाग घेऊन जनजागृती केली. त्या मुळे कुमारी सालिया खान प्रवेशिका यांचे कौतुक होत आहे.
शालेय पौष्टिक आहार अभियान..अंगणवाडी केंद्राची जणजागृती...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी