सिलेंडर दरवाढीमुळे पुन्हा पेटल्या चुली...उज्वला गॅस योजनेचा उडाला बोजवारा...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..

केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे वाटप  केले . परंतु सिलिंडरच्या भावात सातत्याने वाढ होत असल्यामुळे गरिबांना सिलिंडर परवडेनासे झाले आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वयंपाक करताना त्रास होऊ नये , त्याचबरोबर प्रदूषणाला आळा बसावा व वृक्षतोड थांबावी , या हेतूने केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबाला उज्ज्वला  गॅस योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे वाटप केले . या योजनेला चांगला प्रतिसादही मिळाला . परंतु सिलिंडरचे भाव आता गगनाला भिडले असुन . सिलिंडरच्या भावात सातत्याने होत आलेल्या भाववाढीमुळे गरिबांना परवडणारे नसल्याने ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा आपला मोर्चा चुलीकडे वळविला आहे . रिकामे सिलिंडर असूनही गॅस भरण्यासाठी पैसे नाही , अशी स्थिती आता ग्रामीण भागातील गृहिणींची झाली आहे . त्यामुळे केंद्र शासनाची योजना चांगली असतानाही महिला वर्गांना मात्र लाकडी गोळा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 

 महिलांच्या डोळ्यात आले पाणी..

     उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील गरीब कुटुंबातील कमी उत्पन्न असलेल्या महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले असताना खेडेगावातील व शहरी भागातील गरीब महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते . रोजगार करून चार पैसे मिळवून जगणाऱ्या या कुटुंबांना गॅससिलिंडर पाहायला मिळाले . मात्र सिलिंडरचे भाव वाढल्याने महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले आहे . सतत होणाऱ्या सिलिंडरच्या भाववाढीमुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे .

सिलेंडरच्या भावात सातत्याने वाढ होत असून ग्रामीण व शहरातील गरीब महिलांना  सिलेंडर आता परवडेनासे झाले आहे .समोर सणासुदीचे दिवस पाहता महिलांच्या डोळ्यात पाणी येत आहे. तरी केंद्र शासनाने लवकरात लवकर गॅस सिलेंडर चे वाढते भाव कमी करावे

 राजेश वर्मा

 तालुका अध्यक्ष - युवा स्वाभिमान पार्टी

Previous Post Next Post