उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार ! मुबंई येथे बांधकाम मंत्री ना.चव्हाण ह्यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान..!


जळगाव जामोद प्रतिनिधी:-

बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील जळगांव जा.सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कार्यरत उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट़ अभियंता म्हणुन सन 2019 चा जाहीर झालेला पुरस्कार मुबंई येथे बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण ह्यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. शासकीय सेवेत जितेंद्र काळे यांनी उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यांचा या उल्लेखनीय कार्याचा गौरव 15 सप्टेंबर रोजी अभियंतादिनी मुंबई येथे  सपत्नीक  सन्मानचिन्ह़ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले आहे.संतनगरी शेगांव विकास आराखडयाअंतर्गत शाखा अभियंता म्हणुन काम करीत असतांना उंच पादचारी पुल तसेच इतरही पुर्ण कामे विशेष लक्ष घालुन केल्याने संतनगरीच्या वैभवात भर घातली आहे .शेगांव विकास आराखड्यातील रस्ते , पुल , इमारती पुर्णत्वास नेण्यास मोलाचा वाटा आणि काथरगांव पिंप्री या गावाच्या नदीवर बांधण्यात आलेल्या पुल बंधारा हा राज्यातील एकमेव जलसंवर्धणाचा प्रकल्प़ साकारला आहे इत्यादी बांधकाम पूर्ण केली आहेत. उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे यांना सन 2019 साठी वैयक्तीक पुरस्कार जाहीर झाले. मुबई येथे झालेल्या या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांचे सह अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मनोज सवनिक,  सार्वजनिक बांधकाम सचिव दत्तात्रय सोळंकी,प्रशांत नवघरे , गिरीश जोशी ,सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांचेसह अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. जितेंद्र काळे हे जळगाव जामोद येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांना अतिरिक्त प्रभार म्हणून शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखडा या कामावर यांची नियुक्ती करण्यात आली होती.  सार्वजनिक बांधकामविभातर्गत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जळगांव जामोद  सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे यांना  सन 2019 चा जाहीर झालेला पुरस्कार  बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेहस्ते सन्मानचिन्ह़ व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. त्याबददल त्यांचे महाराष्ट्रातील सर्व अभियंता व इतर अधिकारी वृंददातर्फे कौतुक करण्यात येत आहे व त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.

Previous Post Next Post