बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचे 9 ऑक्टोंबरला आयोजन...ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर गृप आणि बुलडाणा सायकलींग गृपचा उपक्रम...


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

बुलडाणा  जिल्ह्याचे वैभव असलेल्या बोथा फॉरेस्टचा अर्थात ज्ञानगंगा अभयारण्यचा पर्यटनाच्या दृष्टीने प्रसार आणि प्रचार होण्या बरोबरच पर्यटनाला चालना मिळावी व आरोग्याच्या संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी बुलडाणा अर्बनच्या वतीने बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मान्सुन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी बुलडाणा अर्बन, ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर गृप आणि बुलडाणा सायकलींग गृपच्या संयुक्त विद्यमाने येत्या 9 ऑक्टोबर रोजी या मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यास्पर्धेत 1000 ते 1500 स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे अशी माहीती बुलडाणा अर्बनचे मॅनेजींग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी आज 18 सप्टेंबर 2022 रोजी येथे पत्रकार परिषदेत दिली. येथील बुलडाणा अर्बन रेसिडेंसीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेला ॲड. राखोंडे, नितिन चौधरी व महिला प्रतिनिधी डॉ. सौ. जाधव उपस्थित होत्या. यावेळी मॅरॅथॉन स्पर्धेच्या अध्यक्षपदी डॉ. सुकेश झंवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी शर्टचे विमोचन करण्यात आले. या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक ॲड. शरद राखोंडे यांनी केले स्पर्धे संदर्भातील सविस्तर माहिती डॉ. झंवर यांनी  दिली. ही स्पर्धा 21 कि.मी.ची अर्ध मॅरेथॉन, तसेच 10 कि.मी.,  5 कि.मी.आणि 3, कि.मी.अशा होणार असून बोथा फॉरेस्ट मधील नक्षत्रबन ते बोरखेड फाटा असा साडेदहा कि.मी.आणि पुन्हा युटर्न घेवून नक्षत्रबना पर्यंत अशी 21 कि.मी.चा रन राहणार आहे. 21 कि.मी. स्पर्धेमध्ये वय वर्ष 40 आतील व 40 वर्षाचे पुढील वयाच्या व्यक्तीचा समावेश राहील. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे या स्पर्धे सहभागी होण्यासाठी 21 कि.मी.साठी एक हजार रुपये , दहा कि.मी.साठी 800 रुपये, पाच की मी. साठी 600 रुपये, तीन  कि. मी.साठी 500 रुपये फी आकारण्यात येणार आहे. यामध्ये स्पर्धकाला टी शर्ट, फिनिशर मेडल, प्रमाणपत्र, ब्रेकफास्ट देण्यात येणार आहे. ही स्पर्धा 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 6  वाजता सुरू होणार आहेत. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र शिल्ड देण्यात येणार आहे अशी माहिती डॉ.झंवर यांनी दिली.

कृष्णप्रकाश प्रसाद राहतील ब्रँड अँबेसेडर...

या स्पर्धा नियोजनबध्द पध्दतीने घेण्यात येणार असुन स्पर्धेचे ब्रँड अँबेसेडर म्हणुन बुलडाण्याचे तत्कालीन पोलिस अधिक्षक आणि विशेष पोलिस महा निरिक्षक तथा आर्यनमॅन कृष्णप्रकाश प्रसाद राहणार  असल्याची माहिती डॉ. झंवर यांनी दिली. त्यांच्याशी बोलनी सुरू आहे  याशिवाय औरंगाबादचे आर्यनमॅन नितिन घोरपडे,  कॉमनवेल्थ स्पर्धेत सिल्वर मेडल विजेते अविनाश साबळे यांनाही आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी डॉक्टर जवळ यांनी सांगितले  स्पर्धेच्या काळात सकाळी 5  ते 8  वाजेपर्यंत बोथा मार्ग पुर्णतः वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतुक उन्द्री मार्गे वळविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बुलडाणा अर्बनच्या वतीने कोरोनाच्या आधी अशी फॉरेस्ट रनर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्ष ही स्पर्धा झाली नाही. बुलडाणा जिल्ह्यात चांगले रनर आहेत त्यांच्या उत्साह वाढविण्या बरोबरच स्पर्धकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नावलौकीक मिळवावा म्हणून अशा स्पर्धा आवश्‍यक असल्याचे डॉ. झंवर म्हणाले.

नितीन चौधरी व सिद्धी डिडोळकर चा सत्कार 

बुलडाण्याच्या आयर्न मॅन म्हणून ओळखले जाणारे आणि नुकतीच दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वात जुनी मॅरेथॉन म्हणून ओळख असलेल्या कॉमरेड ही 90 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणारे नितीन चौधरी आणि बुलढाणा येथील उदयनमूख लॉन्ग रनर असलेली सिद्धी डिडोळकर हिचा बुलडाणा अर्बनचे मॅनेजिंग डायरेक्टर तथा बुलढाणा अर्बन मॅरेथॉन स्पर्धेचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर हस्ते सत्कार करण्यात आला

Previous Post Next Post