संग्रामपुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . हया झालेल्या नुकसानग्रस्त़ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ झालेल्या नुकसानाची पंचनामा व सर्वे करण्याचे डॉ.संजय कुटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी तहसिल कार्यलयात अधिकारी, कर्मचारी यांची बैठकित दिले.संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने या परिसरात पिकांचे नुकसान झाले आहे. या संबधीत आ.डॉ.संजय कुटे यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यलयात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांची बैठक घेतली. तालुक्यात अतिवृष्टी ने खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून घ्या असे निर्देश देत एकही शेतकरी वंचित रहायला नको,. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तिन्ही कर्मचाऱयांनी संयुक्तपणे पंचनामे तातडीने करून लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल या साठी यंत्रणेने कामाला लागावे अश्या सूचना या बैठकीत आमदार डॉ. कुटे यांनी दिले.ह्यावेळी तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर ,गटविकास अधिकारी संजय पाटील,तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे,सर्व मंडळअधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक ,भाजपाचे तालुकाध्यक्ष लोकेश राठी सह पदाधिकारी, कार्यकर्ते, इतर कर्मचारी,शेतकरी बांधव उपस्थित होते.
तहसिल कार्यलयात आ.डॉ.संजय कुटे यांच्या उपस्थितीर अधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकसानीचे तत्काळ पंचनामा करण्याचे दिले निर्देश..!
संग्रामपुर ता.प्रतिनिधी:-