शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मा जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांच्या नेतृत्वात शिवसेना व युवासेना मध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी केला प्रवेश. प्रतापराव जाधव यांनी दसरा मेळाव्याला येण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे पाटील व उपजिल्हा प्रमुख देविदास घोपे, घाटाखालील ता.प्रमुख विजय साठे मलकापूर,ता. प्रमुख सुनील जूनारे नादुरा,ता.प्रमुख केशवराव ढोकणे संग्रामपूर,ता. प्रमुख रामेश्वर थारकर शेगाव, युवासेना ता.प्रमुख उमेश शेळके शेगाव,युवासेना ता.प्रमुख पंडीत बिचारे नांदुरा यांच्या उपस्थितीत जळगाव जामोद ,पातूर्डा,पळसोडा,सगोडा, खातखेड,भोनगाव,आडसुळ,वरखेड,नागझरी,नांदुरा,आसलगाव जवळा बाजार या गावातील कार्यकर्त्यांचा शिवसेना व युवासेना मध्ये विश्राम भवन शेगाव येथे जाहीर प्रवेश घेण्यात आला.
खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत व युवासेनेत अनेकांचा प्रवेश...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-