राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी गुणगौरव,मान्यवरांचा सत्कार, रोजगार व स्वयंरोजगार, कायदेविषयक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन...


मलकापूर ता.प्रतिनिधी:-

24 सप्टेंबर शनिवार रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वर्धापनदिनानिमित्त संत सोनाजी महाराज सामाजिक सभागृह,पंचमुखी हनुमान मंदिराजवळ,बुलढाणा रोड मलकापूर येथे इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त कर्मचारी तथा समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर, कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आदी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेशीमगाठी वधू- वर सुचक मंडळाचे अमरावती विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बुलढाणा (उत्तर) जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव इंगळे हे होते.यावेळी विचार पिठावर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य संचालक तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ अरविंद कोलते, मलकापूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ, काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष संजयभाऊ काजळे, मदनलाल किसनलाल संचेती शिक्षण संस्थेचे सचिव सुरेशभाऊ संचेती, मुख्याध्यापक शैलेंद्रसिंह राजपूत, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बुलढाणा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष भागवत तांदळे, रोजगार व स्वयंरोजगार विगाचे जिल्हाध्यक्ष विजय तांदळे, शिक्षक व कर्मचारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंत शेकोकार, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर गणबास , संत सोनाजी महाराज बहुउद्देशीय संस्था मलकापूरचे उपाध्यक्ष पांडुरंग चिम, जिल्हा सल्लागार अॅड रविंद्र काकडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविकात बुलढाणा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष भागवत तांदळे यांनी महासंघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे स्वरूप व राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका विषद केली.यानंतर इयत्ता दहावी व बारावीतील एकुण 51 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ, गुरु रविदास महाराज यांची प्रतिमा व राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका-पुस्तिका देऊन गौरविण्यात आले.विविध क्षेत्रात दिर्घकाळ सेवा करून सेवानिवृत्त झालेले शिक्षक ओंकार इंगळे, तुकाराम वानेरे, नामदेव निवृत्ती तायडे, हरिभाऊ निवृत्ती तायडे,नामदेव माधव तायडे, प्रल्हाद तुळशीराम तायडे, प्रकाश लक्ष्मण तायडे, अरूण महादू तायडे, भागवत मुक्ताराम तायडे, संपत निनू तायडे, बारसू मुक्ताराम तायडे, नारायण रामभाऊ तायडे, सेवा निवृत्त प्राचार्य निना शंकरराव सुरन्से, सेवा ट्राफिक इंस्पेक्टर सुनील शेकोकार, सेवा निवृत्त आर एम एस हरिदास देवाजी गणबास, माजी सैनिक किसन सुखदेव खराडे, सेवा निवृत्त पोलीस काॅन्स्टेबल विठ्ठल शंकर वाढे, सेवा निवृत्त एस टी डेपो कंन्ट्रोलर हिरालाल शंकर पठ्ठे यांचा शाल, पुष्पगुच्छ, गुरु रविदास महाराज यांची प्रतिमा व राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका-पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व नेत्रदीपक कामगिरी करून यशाचे शिखर गाठून समाजाचे नांव लौकिक करणारे अमरावती विभागात इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या अध्यक्ष पदी निवड झालेले तथा एम सी एन न्युज चॅनेलचे संपादक राजीव वाढे, फिजिकल एज्युकेशन विषयात पी एच डी प्राप्त करून कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात पी एच डी च्या विद्यार्थ्यांना गाईड म्हणून निवड झालेले व विद्यापीठ अभ्यास मंडळाचे सदस्य तथा डायरेक्टर आॅफ फिजिकल एज्युकेशन या पदावर भडगांव येथील महाविद्यालयात कार्यरत असलेले व विद्यापीठात टाॅपटेन अवार्ड विजेते प्रा डॉ दिनेश हरीभाऊ तांदळे व प्राध्यापिका सौ ज्योती दिनेश तांदळे, अंकुर साहित्य संघाचे नवनिर्वाचित बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा सेवा निवृत्त मुख्याध्यापक शालिग्राम चहादू वाडे, केंद्र शासनाचा आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुरेश उतपूरे, खामगांव अर्बन बॅन्केचे शाखा व्यवस्थापक तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नांदुरा शहर अध्यक्ष गोपाल सावरकर, नॅशनल वेटलिफ्टिंगमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून गोल्ड मेडल मिळविणारे अजय शिंगणे, माजी सैनिक संघटनेचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संग्रामपूर तालुका अध्यक्ष अरूण निंबोळकर, असिस्टंट स्टेशन मास्टर या पदावर नियुक्ती प्राप्त भारती संदीप शेकोकार, राज्यशास्त्रात सेट परीक्षेत प्राविण्य प्राप्त करून प्राध्यापक पदावर नियुक्त झालेले प्रा निलेश रामदास पिंजरकर, साॅफ्टवेअर इंजिनिअर पदी नोकरी प्राप्त करणारे शुभम परमानंद पाचखंडे, तेल्हारा येथील एस के स्पर्धा परीक्षा अकाडमीचे डायरेक्टर प्राध्यापक सचिनकुमार गव्हाळे , जिल्हा सल्लागार अॅड रविंद्र काकडे आदी सत्कार मुर्तिंचा शाल, पुष्पगुच्छ, राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका-पुस्तिका व गुरु रविदास महाराज यांची प्रतिमा देउन यथोचित सत्कार राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा बुलढाणा च्या वतीने करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष ( उत्तर विभाग) यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री मा. बबनराव घोलप यांनी 24 सप्टेंबर 1995 ला स्थापन केलेल्या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झालेले असून आज देशपातळीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघ या अराजकीय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून चर्मकार समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील समस्या सातत्याने सोडवून समाजाला न्याय देण्याचे कार्य नि:स्वार्थीपणाने अविरत सुरु असून समाजाला मजबुतीने संघटित करून विविध क्षेत्रातील योजनांचा लाभ, समाजोपयोगी उपक्रम, शिबिरे, विदर्भ स्तरिय रेशीमगाठी वधू-वर परीचय पुस्तिका-2023 करीता वधू-वर यांची सुरू झालेली नोंदणी, बुलढाणा जिल्हा स्तरीय चर्मकार समाज  "संवाद" भ्रमणध्वनी डिरेक्टरी करीता सुरु झालेल्या नोंदणीबाबतची माहिती, नियोजित वधू-वर परीचय मेळाव्याची माहिती आदी उपक्रम महासंघाच्या 24 सप्टेंबर या वर्धापनदिनापासून सुरूवात करून महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांचा वाढदिवस 10 आक्टोंबर पर्यंत या पंधरवड्यात जिल्ह्याभरात राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यवसाय व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय तांदळे यांनी व्यवसाय क्षेत्रात यशस्वीपणे स्वयंरोजगार निर्माण करण्याबाबतचे अनुभव विषद करून चिकाटी, जिद्द आणि प्रयत्नशील राहावे या विषयावर मार्गदर्शन केले. कायदेविषयक शिबिरात महासंघाचे जिल्हा सल्लागार अॅड रविंद्र काकडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेले अधिकार, नागरीकाची कर्तव्ये व कायद्याची माहिती व अंमलबजावणी आदी संकल्पना सविस्तर स्वरूपात स्पष्ट करुन याबाबत समाजात जागृती निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिरामध्ये तेल्हारा येथील एस के करीअर अकादमीचे डायरेक्टर प्रा सचिनकुमार गव्हाळे यांनी विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासू वृत्ती, कठोर परिश्रम,कार्यक्षमता, कौशल्य गुण,नेतृत्व गुण, निर्णय क्षमता, समयसूचकता,चिकाटी आणि जिद्दीने अभ्यासाची तयारी व पालकांनी घ्यावयाची खबरदारी आदी विषयांवर मार्गदर्शन केले.याप्रसंगी जिल्हा सचिव सुखदेव थोटे, आत्माराम चांदोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शांताराम घुले, जिल्हा संघटक रामदास पिंजरकर, बाळासाहेब वानेरे, संजय भटकर, डॉ दिनेश कळसकार, रामभाऊ काटकर, मनोहर निंबोळकर, युवा आघाडीचे जिल्हा सचिव रमेश घुले,युवा आघाडीचे जिल्हा सचिव संदीप इंगळे, मलकापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, जळगांव (जामोद ) तालुका अध्यक्ष नागेश भटकर, बुलढाणा तालुका अध्यक्ष शालिग्राम इंगळे, संग्रामपूर तालुका अध्यक्ष अरूण निंबोळकर, नांदुरा तालुका अध्यक्ष शालिग्राम वाडे, युवा आघाडी संग्रामपूर तालुका अध्यक्ष प्रमोद गव्हाळे,  युवा आघाडी बुलढाणा तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण पानझाडे, शिक्षक व कर्मचारी आघाडीचे जळगांव (जामोद ) तालुका अध्यक्ष शिवहरी रोजतकार, नांदुरा शहर अध्यक्ष गोपाल सावरकर, मलकापूर शहर अध्यक्ष समाधान सुरवाडे, उपाध्यक्ष मनोज भोंडेकर, सचिव नितीन परसे, संघटक पंकज तायडे, सदस्य निखिल चिम, सारंग शेकोकार, शेगांव तालुका उपाध्यक्ष कैलास कळसकार, माजी सरपंच सुनील शेकोकार आदी पदाधिकारी ,  विद्यार्थी, पालक , समाज बांधव व भगिनींची बहुसंख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव सुखदेव थोटे, वसंत शेकोकार, संदीप इंगळे, मनोहर निंबोळकर, एन एम तायडे यांनी तर आभार शालिग्राम वाडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यांनी परीश्रम घेतले.

Previous Post Next Post