खामगाव या पत्राद्वारे आम्ही आपणांस तक्रार करतो कि आपल्या खामगाव शहर व तालुका परिसरात लम्पी आजाराने ग्रस्त झालेल्या गौ वंश जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे आणि प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे ज्यामुळे असंख्य गौ वंशाच्या मृत्यू झालेले आहे व त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर जनावरांनाही हा गंभीर लम्पी आजार झपाट्यानं पसरत आहे. तरी आपणांस विनंती करतो की लम्पी आजार झालेल्या गौ वंशाला आपल्याकडून स्वतंत्र जागा उपलब्ध करून क्वारंटाइन करून त्यांच्यावर योग्य उपचार करावेत जेणे करून लम्पी ग्रस्त असलेले गौ वंशा वर योग्य उपचार होईल अशी सोय करावी व तसेच लम्पी आजार लागण झालेल्या गौ वंशांच्या मालकाला क्वारंटाइन बाबतीत पत्र देवून अवगत करावे. तसे न झाल्यास आमच्या संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी.आमच्या या तक्रारी व विनंतीची गंभीर दखल घेऊन ७ दिवसाच्या आत योग्य कार्यवाही करावी व केलेली कार्यवाहीचे संपूर्ण तपशील आम्हाला पत्राद्वारे सूचित करावे.सुरज यादव, सिद्धेश्वर निर्मळ, ज्ञानेश सेवक, प्रशांत पांडे, सागर उबरकर, पुरुषोत्तम ठोसर, चेतन कदम, सतीश काले, सागर ठोसरे, शुभम ससाने, जितेंद्र गोयल, सागर चव्हाण, विशाल नाटेकर, केतन पांडे, भीमराव गवई याच्यासह 33 लोकाच्या स्वाक्षरी आहे•
लम्पी विषाणूने ग्रस्त असलेल्या गौ वंश जनावरांना वेगळे ठेवून क्वारांटाइन करा..एकनिष्ठा गौसेवा फाऊंडेशन, संस्थापक अध्यक्ष सुरज यादव...
बुलढाणा जिल्हा/प्रतिनिधी सुरज देशमुख...