उद्या जळगाव येथे शिवसेनेची हिंदू गर्व गर्जना यात्रा...शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ नामदार गुलाबराव पाटील यात्रेला मार्गदर्शन करणार...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर नामदार गुलाबराव पाटील यांना जळगाव खान्देश तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.येणाऱ्या दसरा मेळाव्याचे आयोजन म्हणून शिवसैनिकांना आव्हान करण्याकरिता पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार १ ऑक्टोबर रोजी शिवसेनेची संपकयात्रा, शिवसेना हिंदूगर्वगर्जना सायंकाळी ५ वाजता नगर परिषद हॉल जळगाव जा. येथे  संपर्क यात्राचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील ही मुलुख मैदानी तोफ या संपर्क यात्रेला संबोधित करणार असून या संपर्क यात्रेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन शिवसेना नेते खा प्रतापराव जाधव ,आमदार संजय रायमूलकर,आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.ना. गुलाबराव पाटील यांचेसह माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव, पंचायतराज समितीचे प्रमुख आ संजय रायमूलकर,आमदार संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा बळीराम मापारी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, युवासेना सहसचिव ऋषी जाधव यांची उपस्थिती असणार आहे.१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव जामोद येथे संपन्न होणाऱ्या या संपर्क यात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख शांताराम दाने यांनी नागरिकांना केले आहे.

Previous Post Next Post