भरोसा तालुका चिखली येथे 2 कोटी 25 लक्ष रुपयाचा विविध विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी उद्घाटक म्हणून बोलताना डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब पुढे म्हणाले की भरोसा हे गाव शेतकऱ्याच्या विविध विषयावर आंदोलन करण्यासाठी शेतकरी चळवळीचे केंद्र असून शरद जोशी साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे गाव आहे. ज्या दिवशी शेतकऱ्यांना स्वतः पिकवलेल्या मालाचे भाव स्वतःला ठरविण्याचे अधिकार मिळतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे उद्गार काढत शरद जोशी साहेबांना अभिवादन केले विकास निधी व विकास कामावर बोलत असताना सिंदखेडराजा मतदार संघावर बोलताना भावुक होत म्हणाले की सिंदखेड राजा मतदार संघ हे माझे घर असून या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. असे भावनिक उद्गार डॉ. शिंगणे यांनी काढले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गावच्या सरपंच सौ. संगीताताई गणेश थुटटे या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणुन एकनाथ पाटील थुटटे गजाननजी वायाळ ,दीपक म्हस्के, मनोज खेडेकर, डॉ प्रकाश शिंगणे, बाळासाहेब काळे, राम खेडेकर, सुनील खेडेकर, भिकाजी खेडेकर, डॉ विकास मिसाळ,कृष्णा मिसाळ ,सुरेश भुतेकर ,दीपक पुंगळे ,मनोज भुतेकर ,राजू जावळे ,शेखर बोंद्रे, राजू भगत ,नारायण चित्रोळे, अनंता गाडेकर ,मधुकर वायाळ, गजानन परिहार ,सचिन खेडेकर, अरुण पवार,अमोल सुर्वे, तानाजी चिकने ,अमोल भुतेकर, सतीश भुतेकर, गजानन इंगळे ,सत्तार पटेल, दिलीप मामा शितोळे ,भागवत सुरूशे , भिकन भुतेकर ,विनायक साप्ते ,दत्तू गावडे ,अक्षय सुरूशे सागर पडघान गोपीनाथ सुरुशे.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये अंकुश थुटटे आणि गावामध्ये झालेल्या कामाचा लेखाजोखा भांडत विविध समस्यांची मांडणी केली. यावेळी गजानन वायाळ व एकनाथ पाटील थुटटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खेडेकर यांनी केली तर आभार प्रदर्शन भागवत थुटटे यांनी केले यावेळी बाबुराव पाटील ,रामदास थुटटे, पंढरी थुटटे ,भानदास थुटटे ,लिंबाजी माणिकराव थुटटे, ज्ञानेश्वर दौलत थुटटे , शंकर बापू थुटटे, अशोक तुकाराम थुटटे पुजाजी कोल्हे गजानन शंकर थुटटे ,मदन थुटटे, दत्तू दगडू थुटटे, बद्रीनाथ मोळवंडे, व तरुण मित्रपरिवार व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ हेच माझे घर माजी __मंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-