डॉ. आंबेडकर विद्यालयातील शिक्षकांचा भारतीय स्टेट बँके तर्फे शिक्षक दिनी सत्कार...


 जळगाव जामोद प्रतिनिधी:-

डॉ. आंबेडकर विद्यालयात शिक्षक दिनी भारतीय स्टेट बँक जळगाव जामोदच्या वतीने सर्व शिक्षकांना भेट वस्तू,तथा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक श्री. ए.पी. पाटील ,तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही.टी. भारसाकळे सर,पर्यवेक्षक श्री पी. पी. भागवत, जेष्ठ शिक्षक ज्ञानदेव इंगळे,श्री के. ओ. इंगळे,श्री के. आर .पवार,श्री एम. बी. पवार श्री एस. ए. वाघ,श्री एन. व्ही. भागवत ,श्री व्ही. एन गायगोल ,श्री डी. पी. कोकाटे,एस.पी.तिजारे,येस. के.पाचपांडे  व्ही.यू.सोळंके व इतर सर्व शिक्षक यांनी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले,पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन  करून हारार्पण करण्यात आले.या प्रसंगी मारोती शोरुम खामगाव च्या वतीने सुद्धा शिक्षकांचा सत्कार करून भेट वस्तू  देण्यात आली. सत्कारा बद्दल मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक बांधवांनी धन्यवाद मानले. या प्रसंगी भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक ए .पी. पाटील,अजिंक्य ढोले,विवेक जाधव,प्रदीप असोलकर,अंकिता मानकर,अमोल तायडे तर मारुती शोरूम खामगावचे गव्हांदे साहेब यांची उपस्थिती होती

Previous Post Next Post