जळगांव जा.प्रतिनिधी: -
जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव मधील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेली एक नावलौकिक प्राप्त करीत राहणारी शाळा आहे शाळेतील शिक्षक हे वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धा असो किंवा खेळ, शिष्यवृत्ती परीक्षा असो यातून नेहमीच चर्चेत राहत असते.जिल्हा परिषद हायस्कूल शाळेतील NMMS शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे की शिष्यवृत्ती योजना शासनाने राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी राबविल्या जाते या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल शाळेचे 24 विद्यार्थी हे पात्र ठरले असून यामध्ये महाराष्ट्र मधून 17 विद्यार्थी हे एकट्या जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमधून आहेत ही आसलगाव वाशियांसाठी खूप अभिमानाची आहे.शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना या वर्षापासून दरमहा 1000 रुपये म्हणजेच वर्षाचे 12 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे वर्ग 9 वी ते 12 वी पर्यंत ही शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही खूप वर्षापासून चालू आहे परंतु या परीक्षेची माहिती ग्रामीण भागात शाळेमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये माहिती नसते परंतु गटशिक्षणाधिकारी असलेले फाळके साहेब यांनी या गोष्टीचा विचार करून आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा गुणवंत विद्यार्थी खूप आहेत याची जाणीव ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा साठी अर्ज करावा असे मुख्याध्यापक व शिक्षक यांना सांगितले व या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सहभाग घेऊन परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले हेच आज रोजी या शिक्षकांचे फलित झाले असे गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या भाषणात सांगितले.कार्यक्रमा प्रसंगी आसलगाव ग्रामपंचायत च्या वतीने या 24 विद्यार्थ्यांना यापुढे होणारी स्पर्धा परीक्षांसाठी या 24 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे पुस्तक ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायतचे युवा सरपंच सुनील डीवरे यांनी उपलब्ध करून दिले, तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर 1000 रुपये व भगवद्गीता भेट स्वरूपात देऊन त्यांचा सत्कार केला तसेच महाविकास आघाडीचे सदस्य गण यांनी व खिरोडकार सर यांनी या प्रत्येक विद्यार्थ्याला एक वही व पेन देऊन सत्कार केला.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आसलगाव ग्रामपंचायत चे युवा सरपंच सुनील डीवरे, गटविकास अधिकारी भुसारी मॅडम विस्तार अधिकारी संदीप मोरे गटशिक्षणाधिकारी फाळके सर माजी जिल्हा परिषद सदस्य मंजुषा ताई तिवारी ज्योतीताई ढोकणे आसलगाव ग्रामपंचायत चे युवा उपसरपंच गणेश गिऱ्हे, जळगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय शेषराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते विष्णू इंगळे, शाळेचे मुख्याध्यापक भोपळे सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लहासे तसेच उपाध्यक्ष रावनचवरे ग्रामपंचायतचे सदस्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते