जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
स्थानिक सांस्कृतिक भवनामध्ये जळगांव जा पोलीस स्टेशनच्या वतीने सण उत्सत्वाच्या पार्श्वभूमीवर शांतता सभेचे व गणराया पुरस्काराच्या वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या मंचकावर अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे होते तर सहा.पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी, नायब तहसीलदार मार्कंडेय,जळगांव चे ठाणेदार सुनील अंबुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रसेनजीत पाटील,दत्तात्रय पाटील,डॉ.स्वाती वाकेकर,प्रशांत तायडे, मौलवी खलीलुरहमान,गफ्फार मुल्लाजी यांनी आगामी सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आपले विचार व्यक्त केले. सहा.पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी शांततेचे आवाहन करत ठाणेदार अंबुलकर यांनी सुरू केलेल्या गणराया पुरस्काराची मुक्तकंठाने स्तुती केली.जळगांव जामोद ग्रामीण भागातून प्रथम त्रिगुणी गणेश मंडळ,आसलगांव. द्वितीय अष्टविनायक गणेश मंडळ,जामोद तर तृतीय जय बजरंग गणेश मंडळ,सावरगाव यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरी भागातून प्रथम जय गणेश मंडळ, गोबजी खेल.द्वितीय जय हनुमान गणेश मंडळ,रुपलाल नगर.तृतीय ओम बाल गणेश मंडळ, खेर्डा वेस यांना गणराया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार निवड समिती सदस्य अजय वानखडे, खान, ऍड शशिकांत गुप्ता,ऍड काकडे,प्रा.नानासाहेब कांडलकर यांच्या सह विशेष सहकार्याबद्दल श्री सुपो संस्थान पळशी सुपो,सातपुडा शिक्षण संस्था,जळगांव जा,जलाराम मंगल कार्यालय,जळगांव जा,गीता भवन,जळगांव जा. यांच्या प्रतिनिधींचा व नाना उर्फ परेश तायडे सन्मान चिन्ह व गौरव पत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार अंबुलकर यांनी केले तर संचलन सहा.पोलीस निरीक्षक कैलास चौधरी यांनी तर आभार सहा.पोलीस निरीक्षक सागर भास्कर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक कैलास चौधरी,सागर भास्कर, पोलीस उप निरीक्षक किशोर घोडेस्वार,पोलीस उप निरीक्षक आवारे मॅडम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
