हिवरखेड येथे एकदिवसीय ईनामाय उत्सव साजरा..वर्षानुवर्षे जुनी परंपरा कायम,,,,,

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा एकदिवसीय ईनामाय उत्सव साजरा करण्यात आला, नवरात्री दरम्यान या उत्सवाला नवमीला रात्रीं  प्रारंभ होतो तर दसऱ्याच्या पहाटेच विसर्जन होते, ही परंपरा १९१७ पासून  ही परमरा सुरू असून या देवीला दसऱ्याच्या अगोदर पूजन करावे लागते,देवीचे पूजन करण्यासाठी गावातील हजारो महिलांची उपस्थिती व सोबतच एक निबु आणि भाकरीचा निवेध आणल्या जातो  , दर्शनाला आलेल्या भक्तांचा रोग राई, ईळा दारिद्र्य  नष्ट होतो,भक्तांच्या मनोकामना ईनामाय पूर्ण करते अशी भक्तांची श्रध्दा आहे,तसेच  ईनामायची स्थापना करण्यासाठी  शेतातून माती आणून ईनामाय मूर्ती बनवली जाते, सोबतच   राखदार म्हणून शखुर आजोबा,  घोडे ,हत्ती बनवले जातात,  हळदि कुकांने मातेचे स्वागत केले जाते,, आज मोठया श्रद्धेने इनामाय उत्सव साजरा केला जातो, या उत्सवाची जबाबदारी दत्तू धुरदेव व त्यांचे कुटूंब जुन्या काळापासून सांभाळत आहेत,, भक्ताच्या हाकेला ईनामाय आजही धावून येते अशी भक्तांची श्रध्दा आहे,

Previous Post Next Post