महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेमध्ये कष्टकरी शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस 2002 पासून शाळेवर काम करत आहेत या लोकांच्या तथा या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी यासाठी जातीने लक्ष देऊन गोरगरीब कष्टकरी स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय लाभ मिळून देण्यासाठी व त्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जनहित कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष लियाकत खान यांनी निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात नमूद आहे की शालेय पोषण आहार अंतर्गत मध्यान भोजन सत्रांमध्ये येणारा खिचडी पदार्थ तयार करणाऱ्या कामगारांना संबंधित खात्यामार्फत महिन्यासाठी फक्त पंधराशे रुपये मानधन देण्यात येते देण्यात येणारे मानधन हे चार ते पाच महिन्यानंतर मिळते पंधराशे रुपये महिना म्हणजे दिवसाला पन्नास रुपये हे कोणत्याच कामगारास न परवडणारे असून हे मानधन अत्यंत तुटपुंजी असून या महागाईच्या काळामध्ये मिळणारे मानधन हे अत्यंत तुटपुंज आहे.राज्यात आज कोठेही कोणत्याही श्रमिकास पन्नास रुपये रोजदारी नाहीच पण खिचडी शिजवणारे गरीब या सदराखाली हे काम करतात या श्रमिकांवर सरकारचे माध्यमातून फार मोठा अन्याय होत आहे तरी यांना किमान वेतन दहा हजार ते पंधरा हजार मासिक देण्यात यावे. जि प खाजगी शाळेतील स्वयंपाक व मदतीस यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये त्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात यावे. स्वयंपाकी तथा मदतनीस यांना विमा संरक्षण लागू करण्यात यावे. जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस यांना शासकीय सेवा सामावून घेण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या दिलेल्या निवेदनात नमूद केल्या आहेत.सदर निवेदनाच्या प्रतिलिपी खासदार प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आमदार संजय गायकवाड बुलढाणा आमदार संजय कुटे जळगाव जामोद यांना दिले आहे.सदर आशयाचे निवेदन देतेवेळी शालेय पोषण आहार शिजवणाऱ्याची जनहित कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष लियाकत खान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गजानन भुसारी, मनोहर वानखडे दीपक भाकरे, गणेश वावगे जरीनाबी फिरोजा,जमसेद तळवी नातीकोदीन, गणेश घुले ,महादेव उबंरकार, शहादेवभाऊ याच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी पालकमंत्र्यांकडे मागणी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
