जलंब पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गावांमध्ये ग्रामीण विभागात एकूण 44 ठिकाणी सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाची मोठ्या हर्ष उल्लासात स्थापना करण्यात आली असून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे तर यामधील 44 गावापैकी बारा गावांमध्ये प्रत्येकी एक गाव एक देवी बसवण्याचा स्तुत्य, आदर्श उपक्रम सुद्धा नागरिकांच्या वतीने राबविण्यात आला आहे पोस्टे अंतर्गत येणाऱ्या माटरगाव खुर्द, चिखली खुर्द, डोलारखेड, इच्छापुर, खोलखेड, टाकळी हाट, निंबी, कोकता, बेलुरा, ब्राह्मणवाडा, लांजुळ, हिंगणा फोटा आधी बारा गावांमध्ये एक गाव एक देवी ची स्थापना केली आहे अशी माहिती ठाणेदार धीरज बांडे पोहेका संजय पहुरकर यांनी दिली आहे.तसेच माटरगाव येथे बारा, जलंब चार, पहुर्जीरा सहा, कुरखेड दोन, खेरडा दोन, आमसरी दोन, आंबोडा दोन आदी ठिकाणी मंडळाची स्थापना केली आहे.तसेच जलम पोस्टे अंतर्गत असलेल्या ज्या बारा गावांमधील ग्रामस्थांनी एक गाव एक देवी बसून गावासमोर एक चांगला संदेश देत स्तुत्य आदर्श व प्रेरणादायी उपक्रम राबवल्यामुळे ठाणेदार बांडे यांनी गावकऱ्यांचे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.
जलंब पोस्टे हद्दीत 44 ठिकाणी नवदुर्गाची स्थापना तर 12 गावांमध्ये एक गाव एक देवी बसवण्याचा उपक्रम.
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी R.C24 न्यूज
