रहमतुल लिल आलमीन हजरत मुहम्मद (सल.अलै)पैगंबर यांच्या जयंती दिन निमित्ताने अकोट येथील अहेलेसुन्नत वल जमात मर्कज चे इमाम व खतीब हाफिज फाजील मुफती मौलाना आमीर रजा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य जुलूस ने अकोट शहरविसीयांना एकते चा संदेश दिला शहरात मुख्य मार्ग ने होत जुलूसचे विसर्जन शौकत अली चौकात करण्यात आले. यावेळी ठीक ठिकानी मुस्लिम, हिंदू बांधवांच्या वतीने रॅलीत सहभागी मुस्लिम बांधवांकरिता चहा, पाणी ,फराळ चे नियोजन करण्यात आले ,तसेच विविध मंडळाच्या वतीने मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सुन्नी मर्कज अहेले सुन्नत जमात चे पदाधिकारी मौलाना सैय्यद मुबश्शीर मौलाना जा्वेद रजा मौलाना. गुलाम हुसेन मौलाना फैसल रज़ा मौलाना अनवर रजा मौलाना सै मुजीब मौलाना असरार गफुर शाह गुड्डू सिद्दीकी जावेद सिद्दीकी सहित मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोट शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत पुलिस उपाधिक्षक व उप विभागीय पोलिस अधिकारी रितू खोकर. एल सी बी. चे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले व ठाणेदार अहिरे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला
अकोट येथे ईद ए मिलाद उत्साहात साजरी-थानेदार अहिरे यांचा तगडा बंदोबस्त....
सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...
