तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांच्या रोडच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड नवापूरती केली असून. वृक्ष लागवडीची नाविन्यपूर्ण योजनाही शासनाची अधिकाऱ्यांसाठी मलाही खाण्याकरिता राबविण्यात येत आहे.वृक्ष लागवड हे मानवी जीवनासाठी अत्यंत लाभदायक आहे , परंतु वृक्षसंवर्धनच्या नावावर वनपाल वनरक्षक अत्यंत भ्रष्टाचार करत आहेत, या भ्रष्टाचाराला आढा घालण्यासाठी शासनाला जागे व्हावे लागेल. व प्लांटेशनवर वृक्ष लागवड झालेल्या ठिकाण्यावर चौकशी करावी लागेल, वृक्ष लागवड थातूरमातूर करणे हा या वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल. वनरक्षक, यांच्यातली संबंधित ठेकेदार सोबत आपुलकीची भावना,व मिलीभगत असल्यामुळे, तुपावरचा मलिदा यांना मिळणार, म्हणून हे वृक्ष लागवड साठी खोदलेले खड्डे न पाहता 100% चांगल्या प्रकारचा अहवाल संबंधित वनपाल हे शासनाला देत आहेत. व ठेकेदाराकडून कमिशन खात आहेत, तसेच रोडवर रोडच्या दोन्ही साईटला लावलेल्या वृक्षांवर संवर्धन म्हणून निदनाचा, सफाईचा पैसा गेला कुठे, व चौकीदार या नावावर खोटे चौकीदार संबंधित अधिकारी दाखवत आहेत,अशा अधिकाऱ्यांना चांगलीच चोख मिळावी, यांना चौकशी डायरीमध्ये उतरावे, जेणेकरून वृक्ष लागवड साठी अधिकारी नेमलेले आहेत, त्यांनी भ्रष्टाचार करू नये.ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना भ्रष्टाचारी अधिकारी म्हणून घोषित करावे, अशी मागणी वृक्ष प्रेमी करीत आहेत.
प्रतिक्रिया
वृक्ष लागवड ही काळाची गरज असून. वनपरिक्षेत्र अधिकारी तेल्हारा यांनी लावलेले अनेक गावांमधे वृक्ष हे दिशाभूल करणारे आहेत, तरी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
अजय इंगळे वृक्षप्रेमी
प्रतिक्रिया
थातूर मातूर वृक्ष लागवड करून अधिकारी हे जनतेचा पैसा खर्च करत आहेत वृक्ष लागवडीच्या नावाखाली अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत. व्यवस्थित झाड लावत नाहीत, चौकीदार कीती आहेत चौकशी करण्यात यावी.
रोशन बांबळे वृक्षप्रेमी.
याबत वनपरिक्षेत्र अधिकारी ,वनरक्षक, वनपाल यांच्या सोबत संपर्क साधला त्यांच्या कडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली,,,,
