जळगांव जामोद तालुक्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट!


जळगांव जामोद प्रतिनिधी :-

लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पहिल्या जाते. अन्यायाला वाचा फोडण्याचे, जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम पत्रकार करीत आहेत. जळगांव जामोद तालुक्यात मात्र तथाकथित तोतया पत्रकाराचा सुळसुळाट झाला असल्याने पत्रकारांची प्रतिमा मलिन होत आहे.जळगांव जामोद तालुक्यात विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी आपले काम चोख बजावीत आहेत. या पत्रकारितेच्या माध्यमातून आदिवासी भागातील समस्यासह इतर लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम करीत आहेत. मात्र आजमितीला या पत्रकारितेला तोतया पत्रकारामुळे काळिमा फसल्या जात आहे.शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे तोतया पत्रकार धाक दाखवून दमदाटी करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. तोतया पत्रकारांनी आपल्या चारचाकी, दुचाकीवर प्रेस लिहिल्याचे दिसत आहे. काहींनी तर मालवाहू वाहनांवर प्रेस लिहिण्याचा प्रताप केलेला दिसत आहे.सदर अश्या अनधिकृत तोतयापत्रकारांच्या वाहनांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Previous Post Next Post