रस्त्याची समस्या निकाली लागत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रमजान शाह व इतरांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन...


 सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी....

अकोट येथील एकरा उर्दू शाळेपासून ते बॉईज उर्दू हायस्कूल अंजनगाव रोड पर्यंत रस्त्याच्या मधोमध मोठ मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जाणा येणाऱ्यांची मोठी कसरत होते. तसेच या रस्त्याने जाता येताना मोठमोठे अपघात या खड्ड्यांमुळे घडत आहेत. सदर रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून मार्गी लागत नसल्यामुळे, तसेच या रोडवरील रजा मेडिकल समोर पुलाला मोठे छिद्र पडले असल्यामुळे त्याही ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा पूल जीर्ण अवस्थेत असल्यामुळे येथे नवीन पूल व्हावा तसेच रोडवरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात यावे यासह मिरवणूक मार्गात अतिशय घाण कचरा असल्यामुळे तो मार्ग साफ करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नगर परिषदेला केली होती परंतु नगरपरिषद प्रशासन डोळेझाक करीत असून उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित नगरपरिषदेला धारेवर धरून येथील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावावा करिता प्रभाग क्रमांक दोनचे सामाजिक कार्यकर्ते रमजान शाह हसन सलमान खान पठाण सय्यद जाबीर उर्फ जाबु त्यांच्यासह इतर नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 3 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी प्रकाश भारसाकडे यांचे सह नगरपरिषद मुख्याधिकारी यांना सदर आशयाचे निवेदन दिले आहे..

Previous Post Next Post