जळगाव जामोद येथील नगरपरिषदेच्या भव्य अशा सांस्कृतिक भवनामध्ये दिनांक एक ऑक्टोबर रोजी हिंदू गर्व गर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने राज्यभर "हिंदूगर्वगर्जना" संपर्कयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त निष्ठावान शिवसैनिकांच्या मेळाव्याला शिवसेनेची मुंलूख मैदानी तोफ,पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील साहेब यांनी रोखठोक मार्गदर्शन केले. मेळावा प्रंसगी शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आंनद दिघे साहेब यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार पुढे नेत आहे.मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आंनद दिघे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेना वाढवणाऱ्या,पक्षासाठी खस्ता खाल्ल्येल्या,संघर्ष केलेल्या सामान्य शिवसैनिकांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्याय मिळत नव्हता.त्यामुळेच अशा सरकारमधून बाहेर पडायचा ऐतिहासीक निर्णय मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घेतला.त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मार्गाने जात आहोत.मा.एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार जनसामान्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर आहे. अनेक जनहिताचे निर्णय आपले शिवसेना-भाजप युतीचे सरकार घेत आहे. तसेच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सच्चा शिवसैनिकाला कायमच न्याय मिळालेला आहे व मिळत राहील हा असा विश्वास मंत्री ना.गुलाबराव पाटील, खा.प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला , शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर , आमदार संजय गायकवाड माजी आमदार डॉ.शंशिकांत खेडेकर,शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम जी दाणे वेळ,युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव उपजिल्हा प्रमुख देविदास घोपे , राहुल मारोडे ,ता.प्रमुख रामा थारकर , अजय परस्कार , संजय धुळे , शहरप्रमुख अरुण ताडे ,शिवसेनेचे बाळू पाटील , अनंता बकाल , गजाननराव देशमुख , युवासेनेचे गणेश वसुले ,राणा जी , सचिन मानकर ,पवन तेलंगडे , चेतन पाटील मतदारसंघातील शिवसैनिक हजारो संख्येने मेळाव्याला उपस्थित होते. शेकडो शिवसैनिकांनी यावेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांचा समर्थन करीत प्रवेश घेतला.तत्पूर्वी सभेच्या सुरुवातीला स्थानिक भाजपा पदाधिकारी यांनी मा ना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच स्वागत केले यावेळी ता अध्यक्ष प्रकाश वाघ , जेष्ठ नेते गजानन सरोदे , युवा मोर्चा अध्यक्ष सचिन देशमुख , बंडू पाटील , कैलास डोबे ,शकिर खान , परीक्षित ठाकरे , पंकज देशमुख , दिलीप खोद्रे , मोहित सारप ,अर्पित देशमुख यांनी पाणीपुरवठा मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचा जंगी सत्कार केला. यावेळी शिवसेनेच्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्याला जिल्हाभरातून हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
हिंदूगर्व गर्जना यात्रेला जळगाव जामोद मध्ये शिवसैनिकांचा प्रचंड प्रतिसाद नामदार गुलाबराव पाटील यांची शिवसेने सह महाविकास आघाडीवर चौफेर टीका...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
