दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगांव जामोद येथे, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो पदयात्रा नोव्हेंबर महिन्यात जळगांव जामोद मतदार संघात येणार आहे. त्यानिमित्ताने नियोजन करिता तथा कार्यकर्ता मेळाव्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे आगमन झाले होते.या कार्यक्रमाचे औचित्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना बारी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.बारी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देवून सर्व मागण्यांचा पाठपुरावा करून योग्य न्याय देण्यात येईल असे आश्वासन याप्रसंगी नाना पटोले यांनी दिले.याप्रसंगी रमेशचंद्र घोलप, डॉ एस के दलाल, श्रीकृष्ण केदार,अर्जुन घोलप, समाधान दामधर, कैलास बोडखे, वसंत धुर्डे,सुरेश हागे,श्याम डाबरे,किसना दामधर,महेंद्र बोडखे,सतीश टाकळकर, मोहन रौदळे,श्रीकृष्ण दातार,किसना धुर्डे, प्रल्हाद राऊत,प्रदीप काटोले,सुभाष ढगे,अनंत ढगे,रुपेश येउल,संतोष टाकळकर,किशोर रौदळे, टाकळकर,अमोल भगत, देविदास केदार,रघुनाथ ढगे, गणेश राऊत यांच्यासह समाजातील बहुसंख्य मान्यवर समाजबांधव यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बारीसमाज बांधवांनी दिले विविध मागण्यांचे दिले निवेदन...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
