जळगाव जामोद प्रतिनिधी:-
जामोद गावामध्ये सरपंच आणि सचिवांनी संगणमताने बराच गैरप्रकार केलेला आहे .गावातील लोकांना १४० गावयोजनेचे शुद्ध पाणी मिळत नाही, गावातील गटारा नजीक असलेल्या बोअरचे पाणी जामोद ग्रामस्थांना प्यावे लागते. त्यामुळे किडनीग्रस्त रुग्णांची संख्या गावामध्ये भरपूर वाढली आहे. गावामध्ये मोठे मोठे पोल लक्षावधी रुपये खर्च करून बसवले परंतु त्यावर लाईटच बसवले नाही. अर्ध्या गावामध्ये अंधाराचे साम्राज्य आहे. अशुद्ध पाणीपुरवठा होत असला तरी पाणीपट्टी व घरपट्टीची सर्रास वसुली सुरू आहे. पंधरावा वित्त आयोग तसेच दलित वस्ती सुधार योजनेच्या कोट्यावधी रुपयांच्या कामांमध्ये संगनमताने गैरप्रकार झालेला आहे .सरपंच आणि सचिवांनी केलेल्या ह्या गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दलित वस्ती सुधार योजना, १५वा वित्त आयोग व विविध विकास कामांची अधीक्षक अभियंता गुणवत्ता नियंत्रण कक्षामार्फत चौकशी करावी अशा विविध मागण्यांसाठी जामोद येथील गौतम गवई आणि त्यांचे सहकारी अरुण तायडे हे दिनांक २१नोव्हेंबर पासून जामोद ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. ह्या पूर्वी त्यांनी याविषयीचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी, गटविकास अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. निवेदन देऊन पंधरा दिवस झाले असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवेदनाची कसलीही दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांना उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला. ह्यापूर्वीसुद्धा जामोद ग्रामपंचायत मधील सरपंच सचिवाच्या भ्रष्टाचारा विरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर मोठे आंदोलन झाले होते त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी चौकशीचे आदेश देऊनही पंचायत समिती प्रशासनाने प्रकरण दळपले होते. येथे उल्लेखनीय आहे. ह्या वेळेस सुद्धा बऱ्याच ग्रामपंचायत सदस्यांसह जामोद ग्रामवासी यांचे गौतम गवई यांच्या उपोषणाला समर्थन आहे.