एका जाहीर कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली. शिवाजी महाराज मागे पडले असून आताचे शिवाजी महाराज हे नितीन गडकरी आहेत. अख्या जगाला माहीती आहे की, शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांना संपुर्ण देश मानतो अशा महापुरुषांची तुलना गडकरींशी करावी ही एक शरमेची बाब असून यापुर्वी देखील महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावीत्रीबाई फुले यांच्याबद्दलही आक्षेपार्य व्यक्तव्य केले होते.नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावीत्रीबाई फुले अशा थोर महापूरूषांविषयी आक्षेपार्य विधाने करतात परंतू भाजपाचे मंत्री, आमदार, खासदार यांच्या तोंडून एकही शब्द राज्यपालाच्या विरोधोत निघत नाही.तरी राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांनी तात्काळ अशा राज्यपालांची संवैधानिक पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. तसेच भाजपाचे केंद्रीय प्रवक्ते व खासदार सूधांशू त्रिवेदी यांनीसूध्दा छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी अफजलखानाची चार वेळा माफी मागीतलेली आहे असे विधान केलेले आहे. त्यामुळे त्यांचा सुध्दा शिवसेनेने निषेध केला व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ त्यांना प्रवक्ते पदावरून व खासदारकीचा राजीनामा घ्यावा याकरिता दिनांक 21 नोव्हेंबर रोजी शिवसेना जळगांव जामोद तालुक्याच्या वतीने दोघांच्याही फोटोला जोडे चपला मारो आंदोलन करून त्यांचा निषेध करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, ता. प्रमुख गजानन वाघ, विधानसभा संघटक भिमराव पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख रमेश ताडे, बाबाजी टावरी, मंगेश कतोरे, चाँद कुरेशी, सुभाष माने, ईश्वर वाघ, संकेत राहाटे, विशाल पाटील, पवन अवचार, कैलास राजपूत, शेख अनिस, रामकृष्ण वंडाळे, गजानन मांडेकर, राजेंद्र परिहार, गजानन ढगे, गजानन भातूरकर,युवराज देशमुख यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोशारी भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा जळगाव जामोद शिवसेनेने केला जोडे मारून निषेध....
जळगांव जा.प्रतिनिधी:-