मंगल काकडे.तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद..
२६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच तालुका जळगाव जामोद येथील पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे सविधान दिनी सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. प्रीती ताई तायडे. तसेच उपसरपंच सौ. भारतीताई बांगर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.तसेच ग्रामपंचायत सदस्य.सदस्या यांनी सुद्धा अभिवादन केले. सर्वांनी अभिवादन केल्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.यावेळेस.सरपंच सौ.प्रीतीताई तायडे.उपसरपंच सौ.भारतीताई बांगर. ग्रामपंचायत सदस्य. सदस्या.ग्रामसेवक ढगे साहेब. ज्येष्ठ नागरिक. ग्रामपंचायत कर्मचारी. तसेच बुद्ध समाज बांधवांची युवकांची गावातील मंडळींची प्रमुख उपस्थिती होती.