दिनांक 24 नोहेंबर 2022 रोजी मोथा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दशवार्शिक आराखडा संदर्भात चर्चासत्र आयोजित केले होते.मान्यवारांचे स्वागत करिता आदिवासी लोकनृत्य गदली सुसून नृत्य कला प्रदर्शित करून केले मान्यवरांचे स्वागत,विशेष म्हणजे आदिवासी लोकनृत्याने सर्व मान्यवारांचे लक्ष वेधून घेतले.यामध्ये मा.श्री.नंदकुमार सर (अप्पर मुख्य सचिव रो.ह.यो. व इतर मागास बहुजन विभाग) यांनी उपस्थित ग्रामस्थांना श्रीमंत होण्यासाठी काय करावे या विषयावर मार्गदर्शन केले. मा.श्री प्रवीण सिनारे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) मा. श्री. निलेश घुगे (प्रशिक्षक राज्य समन्वयक) यांनी देखील नरेगा मधून योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक कुटुंब कसे स्वावलंबी बनून आर्थिक जास्तीत जास्त पैसे कमवून कसे श्रीमंत होता येईल याविषयी योजना व मार्गदर्शन केले. मा.श्री मधुकर वासनिक (विभागीय मुख्य कार्यकारी अधिकारी) मा.श्रीमती.माया माने (तहसीलदार) मा.श्री.जयंत बाबरे (गटविकास अधिकारी) मा.श्री.अजय घुमे (MIS समन्वयक) श्रीमती. विमल धांडे (सरपंच) श्रीमती. राघिनी भोरे (सचिव) पानी फाउंडेशन चे तालुका समन्वयक , व कार्यक्रम सहायक अधिकारी,तांत्रिक सहायक,कृषी विभाग आणि मोथा येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. चर्चा सत्र होताच पानी इको अंतर्गत प्राची महिला बचत गट सोबत सुरू असलेला गांडूळ खत प्रकल्प ची पाहणी केली.आणि नरेगा अंतर्गत याचा लाभ कसा देता येईल.यावर ही चर्चा करण्यात आली.
चिखलदरा तालुक्यातील गाव मोथा येथे मनरेगा अंतर्गत दशवार्षिक आराखडा संदर्भात चर्चासत्र संपन्न..।
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...