महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत टेम्ब्रूसोंडा गाव चांदपूर मध्ये वयक्तिक स्वरूपाचे तालुक्यामधिल उत्पादन देणारे अस्तरीकरणाचे शेततळे या कामाचे तहसीलदार माया माने मॅडम यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कामाची सुरवात जिल्हाधिकारी पवनीत कौर मॅडम यांच्या हस्ते टेटू या गावामध्ये 29/12/2021 रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन होऊन या कामाला सुरवात झाली त्याचाच दुसरा टप्पा म्हणून टेम्ब्रूसोंडा मध्ये सुरवात करण्यात आली. मी समृद्ध तर माझे गाव समृद्ध माझे गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र या युक्ती प्रमाणे शेतकरी कुटुंब लखपती करणे या संकल्पनेवर आधारित अप्पर मुख्य सचिव नंदकुमार सर श्री शांतनू गोयल सर आयुक्त मनरेगा यांच्या प्रेरणेतून तसेच जिल्हाधिकारी अमरावती व मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनातून शेतकरी कुटुंबाला लखपती करण्यासाठी आणी समृद्ध करण्यासाठी तहसीलदार माया माने मॅडम व गटविकास अधिकारी जयंत बाबरे सर यांच्या अथांग प्रयत्नातून तसेच तांत्रिक अधिकारी विलास कळमटे यांनी त्यात मोलाची भूमिका पार पाडली त्याकरिता त्यांनी स्वतः अंदाजपात्रक तयार करून लाभार्थी यांची भेट घेऊन व लाभार्थी यांना शेततळ्याचे महत्व पटून देऊन त्या लाभार्थी ला शेततळे घेण्यास तयार केले तसेच तालुका स्तरावर सहायक कार्यक्रम अधिकारी नितीन शिरभाते यांनी वरिस्ट अधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रशासकीय अडचणीवर मात करत व कामाला मंजुरात मिळून दिली आणी मार्गदर्शन सुद्धा केले आणी दिनांक 19/11/2022 रोजी शेततळे च्या कामाला सुरवात केली आणी यावेळी गावातील मंजूर, तंटामुक्ती अध्यक्ष रामजी सावलकर, गावातील प्रतिष्टीत नागरिक, शेतकरी मा. तहसीलदार मॅडम, तांत्रिक अधिकारी विलास कलमटे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नितीन शिरभाते , चिखलदरा cfp गौरव भुते, वैभव नांदगावे , नयन गावंडे,रोजगार सेवक सुरेश तोटे , संजय खडके यांनी सुद्धा कामाच्या पहिल्या दिवशी सर्वांनी श्रमदान केले लखपती आणी समृद्ध गाव कसे करायचे या बाबीवर चिखलदऱ्याचे तहसीलदार माया माने मॅडम आणी गटविकास जयंत बाबरे सर जातीने लक्ष घालत आहे.
मनरेगा योजने अंतर्गत ग्रामपंचायत टेम्ब्रूसोंडा येथील गाव चांदपूर येथे मी समृद्ध तर गाव समृद्ध,गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र संकल्पना राबविण्यात आली...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी....