धारणी तालुक्यातील पुष्कळ खेडेगावात टान्शफारम मुळे विज पुरवठा बद असल्याने येथिल शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्याच प्रमाणे धारणी तालुक्यातील तालुकया पासुन ३२ किमी असलेल्या गाव कुंटगा या गावातील असलेले टान्शफारम पधरा दिवसा पासुन बंद असल्याने येथिल शेतकऱ्यांची शेती मध्ये असलेले पिक पाणी अभावी सुखत असल्याने येथिल शेतकरी चिंतेत पडले आहेत. ही माहिती जिल्हा परिषद अमरावती समाज कल्याण मा. सभापती दयाराम काळे यांना मिळताच कुंटगा गावातील शेतकऱ्यांना भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व लगेच येथिल महावितरणच्या अधिकाऱ्यांशी दुरध्वनी व्दारे संपर्क करुन येथिल टान्शफारम नविन देण्यासाठी सागितले आहे. तसेच येथील शेतकऱ्यांना नवीन टान्शफारम लवकरच नाही मिळाल्यास तर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे दयाराम काळे यांनी म्हटले आहे.तसेच धारणी येथे आमदार राजकुमार पटेल हे असुन चिखलदरा तालुक्यातील पदाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जावावे लागतो हा चर्चेचा विषय ठरला आहे.
कुंटगा येथिल टान्शफारम पधरा दिवसा पासुन बंद...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...